मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) देशभरात भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलीय. महाराष्ट्र भाजपनेही प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन (BJP Celebration) केलं. या आनंदोत्सवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी तर कार्यकर्त्यांसोबत ढोल-ताशाच्या तालात ठेकाही धरला. त्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे शिवसेनेला थेट आव्हान दिलंय. आता टार्गेट मुंबई महापालिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्या दृष्टीने महापालिकेसाठी तयारी करण्याचे आदेशही पाटील यांनी यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा इरादा स्पष्ट केलाय. पाटील म्हणाले की, ‘मी आपल्या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरत धाडी चालल्या त्यातून स्पष्ट होईल की विकास किती केला आणि घरी किती पैसे नेले. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे’, असं पाटील म्हणाले.
इतकंच नाही तर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या एका वक्यवाचा आधार घेत सूचक संकेतही दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की 2024 ला आम्ही भगवा झेंडा दिल्लीवर फडकवू. हो भगवा झेंडाच पण तो भारतीय जनता पार्टीचा भगवा. तुम्ही सोबत असाल तर तो लावण्यासाठी आम्ही तुम्हाला सोबत घेऊ, असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले.
उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंडमधे भाजपाची विजयी घोडदौड! प्रदेश मुख्यालयात विजयी जल्लोष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितित https://t.co/MI1LqknPbL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 10, 2022
चार राज्यातील विजयावर बोलताना पाटील यांनी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. ‘भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. अनेकांना वाटतं की मोदींचा करिश्मा संपला. पण त्यांना अजून जमिनीवरील वास्तव माहिती नाही. ज्या प्रकारे मोदी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तर प्रदेशात योगींनी सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हे यश आहे. अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या एक विशिष्ट समुदाय भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी एकत्र येणार आहे. मग हा गेला, तो गेला.. काही उत्तर प्रदेशात फरक पडला नाही. याचं कारण पुरुषांनी तर भाजपला मतदान केलंच असेल. पण महिलांनीही एकत्रितपणे भाजपला मतदान केलंय. महिलांच्या पाच महत्वाच्या गरजा भाजपनं पूर्ण केलंय. इतकंच नाही तर तिथे महिला सुरक्षित नव्हत्या. पण आज उत्तर प्रदेश, बिहारमधील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. आज महिला सुरक्षितपणे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरतात’, असं पाटील म्हणाले.
गोव्यातील विजयाबद्दल पाटील यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. पाटील म्हणाले की, आता अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात की आता पुढे काय? मी म्हटलं आता पुढे काय ते तुम्हीच बघा. आज आम्हाला मोठा विजय मिळाला त्याचा आम्हाला अभिमान आहे. खास करुन देवेंद्रजींचे मला अभिनंदन करायचं आहे. बिहारमध्ये ते प्रभारी होते. तिथे भाजप विजयी झाला. गोव्यात ते प्रभारी आहेत, तिथेही त्यांनी मोठा विजय मिळवून दिलाय.
मा. मोदीजी आणि मा. योगीजी यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित झाल्याने त्यांच्याविषयी महिलांच्या मनात प्रचंड आदर आहे. विविध योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मूलभूत समस्या सोडवल्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपावर विश्वास दाखवत मतदान केले.#BJPAgain pic.twitter.com/IJICdhaLmZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 10, 2022
इतर बातम्या :