दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, विधिमंडळात गोंधळ, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत निर्णय घेतला…

| Updated on: Dec 22, 2022 | 1:16 PM

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद...

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, विधिमंडळात गोंधळ, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत निर्णय घेतला...
Follow us on

नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही (Assembly Winter Session) पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सभागृहात केली.

भरत गोगावले यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर नितेश राणेही बोलायला उभे राहिले. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहातील गोंधळ पाहता विधानसभा अध्यक्षांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.

पुन्हा सभागृह सुरू झालं. पण पुन्हा एकदा नितेश राणेंसह इतर नेत्यांनी दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. पुन्हा गोंधळ झाला अन् सभागृह पुन्हा एकदा 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर सुशांत आणि दिशा सालियान केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

माध्यमांशी बोलतानाही नितेश यांनी आदित्य ठाकरेंचा दिशा सालियान मृत्यू प्रकरणाशी काय संबंध आहे. याची चौकशी व्हीवी अशी मागणी केली. “A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल”, अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.