Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 73 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात, सलग 10 वी पंचवार्षिक, एकदाही पराभूत नाही, हरिव्दार यांची गोष्ट

एकदाही निवडणुकीत पराभूत न होता 73 व्या वर्षीही जिद्दीने काम करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड गावातले हरिद्वार चंद्रभान खडके यंदाच्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत.

वयाच्या 73 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात, सलग 10 वी पंचवार्षिक, एकदाही पराभूत नाही, हरिव्दार यांची गोष्ट
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 10:29 PM

यवतमाळ : राज्याच्या राजकारणात वयाच्या 73 व्या वर्षी न थांबता, न थकता काम करत सत्ता काबीज करणारे अनेक नेते आहेत. तशाच प्रकारे न थांबता, न थकता, आणि महत्त्वाचे म्हणजे एकदाही निवडणुकीत पराभूत न होता 73 व्या वर्षीही जिद्दीने काम करणारे यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड गावातले हरिद्वार चंद्रभान खडके यंदाच्या वर्षीही निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत. (At the age of 73 in the election not a single defeat yavatmal Harivdar Khadke story)

यवतमाळच्या सावरगड गावात 73 वर्षाचा योद्धा गावच्या सक्रिय राजकारणात आहे. गेली 45 वर्ष सावरगड गावात ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, उपसरपंच अशी विविध पदे भूषवत हरिद्वार चंद्रभान खडके हे तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत. वयाच्या 73 वर्षीदेखील हरिद्वार खडके निवडणुकीच्या रिंगणात असून 10 वी पंचवार्षिक निवडणूक ते लढत आहेत.

1972 पासून सतत 9 वेळा ग्रामपंचायत निवडणुकीत ते उभे राहिले आणि विजयी झाले… अपराजित म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती आहे. आता ते यंदाची 10 वी निवडणूक लढवीत असून आताही त्यांना विजयाची खात्री आहे.

आदिवासी बहुल असलेल्या या गावात केलेली विकासकामं, गावात व्यायाम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना ह्या सुविधा त्यांच्याच काळात झाल्या. गावातील रस्ते नाल्याचे कामेही त्यांनी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेले. त्यामुळे गावातील लोकांचा विश्वास जिंकत हरिद्वारजी हे गावातील राजकारणात घट्ट पाय रोवून उभे आहेत.

1972 ला हरिद्वार खडके यांनी पहिली निवडणूक लढवली. त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला आणि थेट उपसरपंच झाले. त्यानंतर त्यानी मागे वळून पहिलेच नाही आजवरच्याया प्रत्येक निवडणुकीत ते निवडून आले 1972 ते 2020 या कालावधीत  20 वर्ष सरपंच, 15 वर्ष उपसरपंच, 2 वेळा पंचायत समिती सदस्य… असे तब्बल 45 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. आजही ते सरपंच आहेत.

याच दरम्यान त्यांच्या पत्नी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2000 साली निवडून आल्या. 1978 साली हरिद्वार खडके यांनी 27 गावातील लोकांना एकत्र करत आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली त्याचे ते 25 वर्ष अध्यक्ष होते. गावातील लोकांचा विश्वास जिंकल्याने मला आजवर जनतेने साथ दिली आणि मी निवडून येत गेलो, असे त्यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले.

वय जरी जास्त असले तरी युवकांना लाजवेल, असं काम हरिद्वार खडके करतात. सकाळी 5 वाजता आपली दिनचर्चा ते सुरु करतात. संपूर्ण गावात रोज भेट देतात. गावातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत राहतात. (At the age of 73 in the election not a single defeat yavatmal Harivdar Khadke story)

हे ही वाचा

चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी : सचिन सावंत

संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं औरंगाबाद नामांतरावर सूचक वक्तव्य

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.