मुंबई : अटल बिहारी वाजपेयी…. संयमी, शांत आणि अभ्यासू राजकारणी अन् तितकेच हळव्या मनाचे कवी… अशी त्यांची ओळख . देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 98 वी जयंती (Atal Bihari Vajpayee Jayanti) आहे. त्यानिमित्त त्यांची गाजलेली भाषणं (Atal Bihari Vajpayee Speech) अन् अर्थपूर्ण तितक्याच भावनिक कविता…
अटलबिहारी वाजपेयी यांचं राष्ट्रावर अतिव प्रेम होतं. शिवाय आपल्या पक्षावर त्यांची निष्ठा होती.हिंदुत्व म्हणजे अटलजी यांचा श्वास होता. आपल्या भाषणादरम्यान जेव्हा अटलबिहारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असायचं. त्यांच्या मनातील हेच भाव त्यांच्या ‘हिन्दू तन-मन हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय’, या कवितेत उतरले आहेत.
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ? ही अटलबिहारी वाजपेयी यांची कविता आजही तरूणांच्या मनात नवी उर्जा देते.
अँधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा, हा त्यांनी दिलेला नारा आजही लोकांच्या लक्षात आहे.
गीत नया गाता हूँ, ही त्यांची कविता जेव्हा जेव्हा ऐकली जाते तेव्हा तेव्हा ही कविता नवी उर्जा देते.
कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आये, घिरें प्रलय की घोर घटाएं, ही त्यांची कविता संकटातही न खचण्याचा संदेश देते…
अटल बिहारी यांच्या कविता जितक्या भावपूर्ण होत्या. तितकंच त्याचं भाषण अभ्यासपूर्ण असायचं. त्यांच्या भाषणाला एक लय होती.अटल बिहारी यांचं भाषण म्हणजे वाहती सरिता होती. संसदेतील त्यांचं भाषण…