आधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई, तिघे ताब्यात
उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची पाहणी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा चांगली अलर्ट झाली. उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे तिघेही ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार आहेत. (ATS detains three for allegedly recce of CM Uddhav Thackeay Raigad Farmhouse)
खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची पाहणी केली.
नेमकं काय घडलं?
फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. मात्र ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.
बंगल्याची पाहणी करुन तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.
एटीएसने या तिघांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर खालापूर पोलीस स्टेशनला तिघांना हजर करण्यात आले. खालापूर न्यायालयासमोर त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपास कार्यात आहेत.
‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे रविवारी समोर आले होते. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (ATS detains three for allegedly recce of CM Uddhav Thackeay Raigad Farmhouse)
दुबईवरुन शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.
शरद पवार यांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगना रनौतविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 9 ते 10 वेळा धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
VIDEO: Anil Deshmukh | “मी दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड बोलतोय”, गृहमंत्र्यांना पुन्हा धमकीचा फोनhttps://t.co/pH1OZ25POQ#AnilDeshmukh #DawoodIbrahim
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
संबंधित बातम्या :
दाऊदच्या सात पिढ्या खाली आल्या तरी ‘मातोश्री’चे वाकडे करु शकणार नाही, एकनाथ शिंदेंची गर्जना
मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीच्या फोनचा NIA कडून तपास करा : संदीप देशपांडे
दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी
(ATS detains three for allegedly recce of CM Uddhav Thackeay Raigad Farmhouse)