आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला, शिवसैनिकांवर संशय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाला आहे (Attack on Harshwardhan Jadhav House). हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला, शिवसैनिकांवर संशय
Follow us
| Updated on: Oct 17, 2019 | 9:07 AM

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाला आहे (Attack on Harshvardhan Jadhav House). हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे (Attack on Harshvardhan Jadhav House). बुधवारी (16 ऑक्टोबर) रात्री दीड वाजताच्या सुमारास हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्यात हर्षवर्धन जाधव यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे (Attack on Harshvardhan Jadhav House). हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर दगडफेक केल्याने घराच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, प्रचारासाठी सध्या हर्षवर्धन जाधव हे कन्नडमध्ये आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबंही कन्नडमध्ये आहे. त्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही.

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्यावरुन हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यानंतर त्यांचं हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

हर्षवर्धन जाधवांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेमुळे औरंगाबादमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“जर आपली लोकं शिवसेनेची असतील, भाजपची असतील, चुका झाल्या तर कान खेचा, मीही त्यांचे कान उपटल्याशिवाय राहणार नाही. मी कन्नडमध्ये सभेला गेलो होतो. तेथेही मी हेच बोललो. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती. त्याला आता अजिबात माफ करणार नाही. चुकतोय, लहान आहे म्हणून मी गेल्या 5 वर्षे त्याच्या चुका पोटात घालत होतो. पण भगव्याशी हरामखोरी मी सहन करु शकत नाही”, असे उद्धव ठाकरे हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल बोलले होते.

काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव ?

“जर मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? अब्दुल सत्तार तुमचा पाहुणा आहे का?” असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

चंद्रकांत खैरेंचीही हर्षवर्धन जाधवांवर टीका

उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर पलटवार केला होता. हर्षवर्धन जाधव हे नीच आहेत, असं म्हणत खैरे यांनी जाधव यांना लक्ष्य केलं. मात्र या टीकेला उत्तर देताना खैरेंनीही अर्वाच्य भाषा वापरली होती.

“हर्षवर्धन जाधव यांनी भगवा झेंडा खाली खेचला आणि त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला, मग उद्धव ठाकरे काय चुकीचं म्हटले. एमआयएमसोबत मैत्री करुन हर्षवर्धन यांनी शिवसेनेला हरवण्याचे काम केले. हा किती नीच आहे. हे इथल्या मतदारांना माहिती नव्हते. आता त्यांना माहित पडले असेल”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.