PM Narendra Modi in Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणांवर भडकले

हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतून व्यक्त होते आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना पुण्यात भाषणाला न परवानगी न मिळाल्याने वातावरण तापलं आहे. आता यावरून जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

PM Narendra Modi in Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणांवर भडकले
खांद्यावर हात अन् आस्थेने चौकशी, नेते दोन, प्रसंग दोन, पण भाव एक; मोदींचे ते दोन फोटो का चर्चेत?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 8:52 PM

मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या स्वागतासाठी शिक्रा पाँइंटवर मुख्यमंत्री पोहचल्यानंतर (Cm Uddhav Thackeray) त्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरे यांना उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरक्षा यंत्रणांवर भडकले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉलच्या नावाखाली आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी केला. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्रीही आहेत, त्यामुळे ते तिथे उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बऱ्याचदा मुख्यमंत्री जात नाहीत, अशा वेळी आदित्य ठाकरे राजशिष्ठाचार मंत्री म्हणून स्वागतासाठी जातात. मात्र यावेळी हा प्रकार घडल्याने आता शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल चढवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना भाषण करण्याची परवानगी न मिळाल्यावरून राजकारण तापलं आहे.

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

देहू येथील पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही.हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप

भाजपकडूनही जोरदार पलटवार

काँग्रेसचाही आक्रमक पवित्रा

पंतप्रधान यांनी फक्त अजितदादा यांचा अपमान केला नाही आहे. त्यांनी महाराष्ट्रचा अपमान केला आहे. पदोपदी पंतप्रधान असे करत असतात. त्यांना त्यामध्ये त्यांना आणि भाजपला मजा येते. पदोपदी महाराष्ट्रचा अपमान महाराष्ट्रची जनता सहन करणार नाही. संविधान आहे, प्रोटोकॉल आहे. रीतिरिवाज आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून या गोष्टी आपण फॉलो करत आहे. एखाद्या राज्यात जायचं तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान करायचा हे काही जनतेला आवडत नाही. या सगळ्या गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात. या देशाच वातावरण अतिशय खराब केलं आहे. महागाई वाढली आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.