हाच माज गांधी खानदानाला होता शेवटी वायनाड शोधावे लागले;  शरद पवारांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचा जयंत पाटलांना टोला

एकवेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे.

हाच माज गांधी खानदानाला होता शेवटी वायनाड शोधावे लागले;  शरद पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावरून भातखळकरांचा जयंत पाटलांना टोला
| Updated on: Sep 08, 2022 | 9:28 AM

मुंबई: एकवेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव होणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी केलं होतं. जयंत पाटलांच्या (Jayant Patil) या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी जोरदार टोला लगावला आहे. हाच माज गाधी खानदानाला अमेठीबाबत होता. शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागलं. तुम्हीही शोधून ठेवा असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. आता अतुल भातखळकर यांच्या टीकेला जयंत पाटील काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.