जितेंद्र आव्हाड वर्षभरापासून झोपले होते काय? : अतुल भातखळकर

| Updated on: Feb 18, 2021 | 8:01 PM

वर्षभरापासून जितेंद्र आव्हाड झोपले होते काय?" असा सवाल मुंबई भाजप प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय.

जितेंद्र आव्हाड वर्षभरापासून झोपले होते काय? : अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : “एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण प्रकल्पातील 10 वर्षांच्या आत झालेले व्यवहार अवैध ठरवायचे, त्यातील सदनिकाधारकांना घराच्या बाहेर काढण्याच्या नोटिस द्यायच्या आणि दुसरीकडे 10 वर्षांची अट 5 वर्ष करू असं जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत. त्यांचं हे म्हणणे म्हणजे मुंबईकर जनतेची निव्वळ फसवणूक आहे. त्यांनी मागील वर्षभरापासून न्यायालयात सरकारची भूमिका मांडून किंवा कायद्यात सुधारणा का केली नाही? वर्षभरापासून आपण झोपला होतात काय?” असा सवाल मुंबई भाजप प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय (Atul Bhatkhalkar criticize Jitendra Awhad over SRA house issue in Mumbai).

अतुल भातखळकर म्हणाले, “मुळातच 10 वर्षाच्या आत खरेदी-विक्री केलेल्या लोकांना संरक्षण देण्याचा कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केला होता. त्यासंदर्भात मंत्र्यांची समिती नेमून अहवाल सुद्धा मागविला होता. तसेच त्याला कॅबिनेटने मंजुरी सुद्धा दिली होती. या निर्णयाला महाधिवक्ता यांनीही मंजुरी दिली होती. या कायद्याविरोधात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवेळी ठाकरे सरकारला यासंदर्भातली बाजू मांडण्याची आवश्यकता होती. परंतु हजारो सदनिकाधारकांना घराबाहेर काढण्याची तीव्र इच्छा असलेल्या ठाकरे सरकारने या संदर्भातील बाजू न्यायालयासमोर मांडून सदनिका धारकांना दिलासा देण्याचे धारिष्ट्य सुद्धा दाखविले नाही.”

‘10 वर्षाच्या आतील सर्व व्यवहार नियमित करण्याचा तात्काळ वटहुकुम काढा’

“ठाकरे सरकारला या सदनिकाधारकांना संरक्षण देण्यात तिळमात्र रस नसल्याचंच यातून स्पष्ट होतं. या संदर्भात मी स्वतः सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर वारंवार आवाज उठवून सुद्धा ठाकरे सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट आता या सर्व सदनिकाधारकांना तात्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यापासून घर रिकामं न केल्यास पोलीस बळाचा वापर करण्याची धमकी ठाकरे सरकारने दिली. ही कारवाई तात्काळ थांबवून कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे,” असंही भातखळकर यांनी नमूद केलं.

“या संदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असं न करता आजपर्यंत झालेले सर्व व्यवहार कायम करून 10 वर्षाची अट कमी करून १ वर्ष करावे,” अशी आग्रही मागणी अतुल भातखळकर यांनी केली.

“मोठं जनआंदोलन उभारणार”

ते म्हणाले, “या सदनिका धारकांच्या पाठीमागे भाजप भक्कमपणे उभी आहे. ठाकरे सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही कोणत्याही सदनिकाधारकांना घराबाहेर काढू देणार नाही. या हजारो सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्यावतीने मोठे जनआंदोलन उभारणार आहे.”

हेही वाचा :

अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाही, कॅनडाच्या अक्षय कुमारला भारतावर बोलण्याचा अधिकार काय? : राष्ट्रवादी

जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय, SRA ची घरे विकण्याची मर्यादा घटवली

तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रं, जनता आता कंटाळलीय; चंद्रकांत पाटील यांची सडकून टीका

व्हिडीओ पाहा :

Atul Bhatkhalkar criticize Jitendra Awhad over SRA house issue in Mumbai