Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers protest | सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत; तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी : अतुल भातखळकर

मोदी तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत, असे ट्विट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले.

Farmers protest | सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत; तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी : अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 8:18 PM

मुंबई :  केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरात विरोध केला जातोय. या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा रोखून धरल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. या पार्श्वभूमीवर “देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत,” असे ट्विट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उद्देशून केले. (Atul Bhatkhalkar criticizes activist Medha Patkar on farmers protest)

देशात कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी दिल्लीच्या वेशीवर या कायद्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडलेलं आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यासाठी, काहींनी दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल,” अशी मागणी केली आहे. मेधा पाटकर यांच्या याच भूमिकेवर भातखळखर यांनी ट्विटरद्वारे भाष्य केले.

दमबाजी कुणाला करताय ?

“दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्या सारख्या भपकेबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी,” असे अतुल भातखळकर म्हणाले. (Atul Bhatkhalkar criticizes activist Medha Patkar on farmers protest)

शेतकऱ्यांनी प्रस्ताव फेटाळला

दरम्यान, केंद्र सरकारने कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना बुधवारी (9 डिसेंबर) प्रस्ताव पाठवला होता. मात्र, हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. याबाबत आंदोलक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला आणखी आक्रमक रुप येणार असल्याचा इशारा दिला. दिल्लीला लागणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांना सील करु, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. यावेळी त्यांनी अंबानी-अडाणी यांच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल खरेदी करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली.

संबंधित बातम्या :

MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम

शेतकरी कृषी कायद्यासोबतच, राजस्थानमधील पंचायत समितीच्या निकालावरुन स्पष्ट : जावडेकर

Nana Patole | कृषी कायदा तातडीनं रद्द करा; विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

(Atul Bhatkhalkar criticizes activist Medha Patkar on farmers protest)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.