मुंबई : यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालला जोरदार तडाखा दिला. अळावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जवळपास 30 तास मंत्रालयात कंट्रोल रुममध्ये ठाण मांडून होत्या. राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी लक्ष ठेवलं. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर यास धडकण्यापूर्वी मंगळवारी तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी मंत्रालयातच ठाण मांडून बसणार आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. याबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापण्यात आली. हाच धागा पकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. (Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut over Mamata Banerjee’s news in Saamana)
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करुन संजय राऊत यांना टोला हाणलाय. त्याचबरोबर त्यांनी तौत्के चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरही टीका केलीय. “संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा… सामानाची बातमी… ‘यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’ मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात @OfficeofUT घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा…
सामानाची बातमी…
‘यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये.@rautsanjay61 ? pic.twitter.com/7Hda1T7EUw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 26, 2021
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी रात्री मंत्रलयातच ठाण मांडून राहिल्या. नियंत्रण कक्षातून त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीबाबत योग्य सूचनाही केल्या. ममता बॅनर्जी मंगळवारी मंत्रालयातच थांबणार असल्याची बातमी सामनात छापण्यात आली आहे. या बातमीमध्ये ममता बॅनर्जी यांचं कौतुकही करण्यात आलंय.
दरम्यान, तौत्के चक्रीवादळने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे या 3 जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी तीन दिवसांचा कोकण दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केलीय. मुख्यमंत्र्यांना दौरा चक्रीवादळापेक्षाही वेगवान होता, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या, आता नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय; निलेश राणेंची जहरी टीकाhttps://t.co/yavf1uaphs#rohitpawar | #nileshrane | #bjp | #ncp | #MaharashtraFightsCorona | @meNeeleshNRane
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO: यास चक्रीवादळ वेगानं पश्चिम बंगालच्या दिशेने; वस्त्यांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी
VIDEO: पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचे थैमान, लोकांच्या कार पाण्यात बुडाल्या
Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut over Mamata Banerjee’s news in Saamana