“अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवाय काही केलं नाही, आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायेत” सामनातील टीकेला भातखळकरांचं प्रत्युत्तर

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवाय काही केलं नाही, आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायेत सामनातील टीकेला भातखळकरांचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 8:44 AM

मुंबई : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रति शाब्दिक वार केलाय. “अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवाय काही केलं नाही, आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायेत”, अश्या शब्दात भातखळकरांनी सामनातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरेंनी घरी बसून पक्ष गमावला, असंही अतुल भातखळकर म्हणालेत. तुम्ही सातत्याने भाजपला कमळाबाई म्हणत हिणवता, आम्हीही तुम्हाला ‘पेंग्विन’सेना म्हणू असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

सामनातून टीकास्त्र

“शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

गुजरातमध्ये अलीकडे मोठया प्रमाणात चरस गांज्यांचे पीक आले आहे. त्या चोरटया गांजांची नशा मिशन मुंबईवाल्यांना चढली असेल तर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातच ती उतरविण्याचे बळ आई जगदंबेने महाराष्ट्रीय मनगटात दिले आहे. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....