Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्याचा शिवसेनेला खोटा कळवळा, अतुल भातखळकरांचा आरोप

दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्याचा खोटा कळवळा शिवसेनेला आल्याचा आरोप भातखळकरांनी केला. (Atul Bhatkhalkar slams Shivsena)

दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्याचा शिवसेनेला खोटा कळवळा, अतुल भातखळकरांचा आरोप
अतुल भातखळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 12:49 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गाझीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यांसंबधी माहिती दिली होती. संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलकांच्या भेटीला जाण्याचं जाहीर केल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर टीका केली आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्याचा खोटा कळवळा शिवसेनेला आल्याचा आरोप भातखळकरांनी केला. (Atul Bhatkhalkar slams Shivsena over Sanjay Raut visit to Farmers at Gazipur Border)

अतुल भातखळकरांचं टीकास्त्र

राज्यात शेतकरी त्रस्त आहेत. शिवसेनेने ना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, ना हेक्टरी वचन दिलेले २५ हजार रुपये दिले, ना शेतकऱ्यांच्या वीज बिलात सूट दिली, अशा शब्दात अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आता “शिवसेनेला दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्याचा खोटा कळवळा आला… विश्वासघातकी शिवसेना…”, अशा शब्दात भातकखळकरांनी सेनेला टोला लगावला.

अतुल भातखळकरांचे ट्विट

उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार शेतकरी आंदोलनात : संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत गाझीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यांसंबधी माहिती दिली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय.

“महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांचं ट्विट

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

“थपडेवर थप्पड, थपडेवर थप्पड”, भातखळकरांनी सेनेला पुन्हा डिवचलं

(Atul Bhatkhalkar slams Shivsena over Sanjay Raut visit to Farmers at Gazipur Border)