कोण कुणाचा बाप, कोण गद्दार, अयोध्या पोळ पाटील या संतोष बांगर समर्थकाला भिडल्या, ऑडिओ क्लिप चर्चेत!

या फोनवरच्या संभाषणात, अयोध्या पोळ पाटील यांच्याबद्दळ अर्वोच्च भाषा वापरली गेली. ज्याला अयोध्या यांनीही उत्तर दिलं. या ऑडिओ क्लिपनंतर उद्धव ठाकरेंनीही अयोध्या यांची विचारणा केली.

कोण कुणाचा बाप, कोण गद्दार, अयोध्या पोळ पाटील या संतोष बांगर समर्थकाला भिडल्या, ऑडिओ क्लिप चर्चेत!
अयोध्या पोळ पाटील यांना संजय बांगर समर्थकाना फोन
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 7:10 PM

मुंबई: अयोध्या पोळ पाटील (Ayodhya Pol Patil) हे नाव आता शिवसैनिक असो, वा शिंदे गटातील (Shiv sena Political Crisis) आमदार, सगळ्यांमध्ये चांगलंच फेमस झालं आहे. याचं कारण, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना थेटपणे भिडणं असो, उद्धव ठाकरेंनी थेट याची दखल घेणं असो, किंवा ठाकरेंनी थेट अयोध्या पोळ पाटील यांना फोन करणं, या सगळ्याच घडामोडीत अयोध्या या सोशल मीडियावर (Viral Video) चर्चेच्या विषय बनल्या आहेत.

त्याचं झालं असं की, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गाडीला हात लावून दाखवा, तसं केलं तर आमदारीचा राजीनामा देईल, असं आव्हान ठाकरे गटाला दिलं, त्यानंतर हिंगोलीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बांगर यांच्या गाडीवर हल्लाही झाला.या हल्ल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चांगलाच चिघळला.

याच वादात अयोध्या पोळ पाटील यांनी उडी घेतली. आधी दिलेल्या आव्हानाप्रमाणे बांगर यांनी राजीनामा देऊन दाखवावा, असं प्रतिआव्हानच त्यांनी दिलं. पोळ यांच्या या व्हिडीओनंतर शिंदे गटात, विशेषत: बांगर समर्थक जास्तच चिडले. त्यातील एका समर्थकाने थेट अयोध्या पोळ पाटील यांना फोन केला.

हे सुद्धा वाचा

या फोनवरच्या संभाषणात, अयोध्या पोळ पाटील यांच्याबद्दळ अर्वोच्च भाषा वापरली गेली. ज्याला अयोध्या यांनीही उत्तर दिलं.

या सगळ्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हल्ला केला, त्यावेळी माझं कुटुंब गाडीत होतं, म्हणून शांत बसलो, हिंमत असेल तर पुन्हा एकदा हल्ला करुन दाखवा, असं प्रतिआव्हान आता संजय बांगर यांनी दिलं आहे.

दुसरीकडे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख सूधीर सुर्यवंशी यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. फक्त पोलीस बाजूला करा, आणि हिंगोलीत या, बाळासाहेबांचे शिवसैनिक काय आहेत, हे तुम्हाला दाखवतो, असं सुधीर सूर्यवंशी म्हणाले आहेत. मात्र, यात अयोध्या पोळ पाटील यांच्या बांगर समर्थकाशी संभाषणाची ती क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

ऐका ती व्हायरल ऑडिओ क्लिप:

बरं ही धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतली, आणि अयोध्या पोळ पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. या संवादात त्यांनी अयोध्या पोळ यांना पोलीस तक्रार देण्याचा सल्ला दिला. शिवाय, कुणी डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका, हेही सांगितलं

पाहा बांगर आणि अयोध्या पोळ पाटील वाद नेमका काय?:

थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्या यांना फोन केल्याने, त्यांचं महत्त्व एकाएकी वाढलं, त्यामुळे आता सोशल मीडियावर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून अयोध्या यांचं कौतुक केलं जात आहेत. तर शिंदे समर्थकांकडून अयोध्या यांना आव्हान देण्याचं काम अजुनही सुरु आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....