औरंगाबाद : औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. खैरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला. (Aurangabad Chandrakant Khaire supporter Shivsainik enters MNS in presence of Raj Thackeray at Pune)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणुका तोंडावर असताना मनसेने मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसत आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या निष्ठावंत समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हे प्रवेश झाले. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.
हेही वाचा : 38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत
मनसेत प्रवेश केलेले काही शिवसैनिक माजी नगरसेवकही आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मनसेच्या महाअधिवेशनापूर्वी ट्विटरवरुन थेट शिवसैनिकांनाच मनसेत सहभागाचं आवताण दिलं होतं.
औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
(Aurangabad Chandrakant Khaire supporter Shivsainik enters MNS in presence of Raj Thackeray at Pune)
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 pic.twitter.com/O7wrJeRxOk
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020