राज्यसभा उमेदवारीत डावलल्यानंतर चंद्रकांत खैरे ‘आऊट ऑफ कव्हरेज’
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र त्यांचे सर्वच फोन बंद येत आहेत. Aurangabad Chandrakant Khaire Unhappy
औरंगाबाद : राज्यसभेच्या उमेदवारीत शिवसेनेने जुन्या-जाणत्या नेत्यांना डावलून आयारामांना झुकतं माप दिल्याने नाराजी पसरल्याचं चित्र आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेही खट्टू झाल्याची माहिती असून खैरे यांचा फोन ‘आऊट ऑफ कव्हरेज’ येत आहे. (Aurangabad Chandrakant Khaire Unhappy)
शिवसेनेच्या कोट्यातून महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवाराची घोषणा काल दुपारी करण्यात आली. काँग्रेसमधून आलेल्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांचा कुणाशीही संपर्क नाही.
उमेदवारी नाकारल्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज असल्यचं बोललं जात आहेत खैरे यांना चक्कर आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र खैरे यांचे सर्वच फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.
‘मला राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण न ती मिळाल्यामुळे थोडीशी नाराजी आहे. पण उद्धव ठाकरेंनी जे ठरवलं, ते मला मान्य आहे. इथे मी एमआयएमशी लढतो, मनसेही आली आहे. त्यामुळे मला संधी हवी होती. उद्धव ठाकरेंनी मला शब्द दिला होता. त्यामुळे आशा होती. मला अजूनही उद्धव साहेब कुठे ना कुठे काहीतरी संधी देतीलच’ असा आशावाद खैरेंनी काल ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला होता.
प्रियांका चतुर्वेदींवर शिवसेनेची मदार
राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी उत्सुक होत्या. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रियांका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे होत्या. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झालं.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असा पक्षात मतप्रवाह होता. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत होते. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक होते. परंतु शिवसेनेने दिग्गजांना डावलून आयारामांच्या पदरात दान टाकलं.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार
- उदयनराजे भोसले – भाजप
- भागवत कराड – भाजप
- रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
- शरद पवार – राष्ट्रवादी
- फौजिया खान – राष्ट्रवादी
- राजीव सातव – काँग्रेस
- प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
(Aurangabad Chandrakant Khaire Unhappy)
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून भाजप आणखी एक उमेदवार निवडून आणेल.
मनसेची ‘शॅडो कॅबिनेट’ चार दिवसात अॅक्टिव्ह, पहिली मागणी आदित्य ठाकरेंकडे https://t.co/ef1jXOk3l2 @mnsadhikrut @ShivSena @ShivsenaComms @AUThackeray @OfficeofUT @RajThackeray @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 13, 2020
राज्यसभेशी संबंधित 9 बातम्या :
राज्यसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीतील चौथ्या जागेचा तिढा सुटला
मला देशाच्या नाही, राज्याच्या राजकारणात रस : एकनाथ खडसे
मला राहू द्या, निदान खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं : संजय काकडे
‘उमेदवारीसाठी धन्यवाद सोनियाजी’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राज्यसभेसाठी नकार
राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित
संजय काकडेंचा पत्ता कट, खडसेंनाही तिकीट नाही, राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी
गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड कोण आहेत?
काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रणनीती, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
Aurangabad Chandrakant Khaire Unhappy