हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!

पुण्यातील मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जाधव पुन्हा चर्चेत आले आहेत. अशावेळी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव कुठेच दिसत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पॅनल उभारण्याची तयारी सुरु केली आहे.

हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:10 PM

औरंगाबाद: पुण्यातील मारहाण प्रकरणावरुन पुन्हा एकदा चर्चेत आलेले कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद होण्याची शक्यता आहे. तर हर्षवर्धन जाधव ऐवजी त्यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी ग्रामपंतायतींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये संजना जाधव यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. (Harshvardhan Jadhav out of Gram Panchayat elections while Sanjana Jadhav enters)

हर्षवर्धन जाधव हे कायम वादात असलेलं व्यक्तीमत्व आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत आहोत, असं सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी आपली पत्नी पुढील राजकारण पाहिल, असंही म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यातील मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जाधव पुन्हा चर्चेत आले आहेत. अशावेळी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव कुठेच दिसत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पॅनल उभारण्याची तयारी सुरु केली आहे. महत्वाची बाबम म्हणजे जाधव पती-पत्नी यांच्यात काडीमोड होणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री!

संजना जाधव यांनी पिशोर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला पॅनल उभा केला आहे. पिशोर गाव हे संजना आणि हर्षवर्धन जाधव यांचं मूळ गाव आहे. पिशोर गावासह संजना जाधव या कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्येही पॅनल उतरवणार असल्याचं कळतंय. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे ग्रामपंचायत निवडणुकीतून बाद झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर संजना जाधव यांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री होताना दिसत आहे.

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल 2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल 3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल 4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल 5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार 6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे 7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल 8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार 9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही 10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल 11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये 12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये 13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये 14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट 15. SC-ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Harshvardhan Jadhav out of Gram Panchayat elections while Sanjana Jadhav enters

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.