Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde News : बिन चपलेचा मरून जाईन, पण शिवसेना सोडणार नाही, औरंगाबादची ऑडिओक्लिप व्हायरल.. शिंदेंच्या दबावाला झुगारणारे किती?

आधी सूरत आणि नंतर गुवाहटीत असलेल्या आमदारांमध्येही उद्धव ठाकरेंशी गद्दारी न करण्याची भावना असलेले अनेक आमदार असू शकतात, ही शक्यता नाकारता येणारच नाही!

Eknath Shinde News : बिन चपलेचा मरून जाईन, पण शिवसेना सोडणार नाही, औरंगाबादची ऑडिओक्लिप व्हायरल.. शिंदेंच्या दबावाला झुगारणारे किती?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:13 AM

औरंगाबादः आमदार नाही झालो तरी चालेल, पण उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) गद्दारी करणार नाही. बिन चपलेचा मरून जाईन, पण शिवसेनेची साथ सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देणारी एक ऑडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. औरंगाबादचे आमदार उदयसिंह राजपूत ( Udaysingh Rajput) यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक आमदार नॉट रिचेबल झालेत. शिंदेंच्या नेतृत्वात ही सगळी फौज सत्ता स्थापनेसाठी नवी वाट धरणार असल्याचं बोललं जातंय, पण या फौजेतही मनमर्जीनं आलेले आणि दबावतंत्राचा वापर करून आलेले असे दोन गट पडले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तुफ्फान व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लिप शिवसेना आमदाराचीच असेल तर हा सूर पकडत ऐनवेळी उद्धव ठाकरेंसोबत जाणारेही कमी नाहीत, अशी शक्यता गृहित धरावीच लागेल. एकनाथ शिंदेंच्या एवढ्या मोठ्या बंडानंतरही ही पुसटशी आशा शिवसेनेच्या डुबती नैया को काफी है… असंच म्हणावं लागेल.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

औरंगाबादमध्ये सध्या तुफान व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये हा उदयसिंह राजपूत यांचा आवाज असल्याचा दावा केला जातोय. हे खरं मानलं तर एक आमदार म्हणतात, अज्ञात व्यक्ती – बोलो बिगबॉस आमदार- मै उद्धव ठाकरेसाहेब के साथ मे है आमदार- आपुन जिंदगी मे गद्दारी नही कर सकता व्यक्ती- बरोबर हो हो आमदार- आपन फिर से आमदार नही बनेगा तो चलेगा, बगर चप्पल का मर जाऊंगा मै, मगर धोका नही देगा किसी को व्यक्ती- हो हो आमदार- चलो , मोबाइल बंद रखे था मैने, चलो ओके…

शिंदेंच्या दबावाखाली किती ?

सध्या गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक आमदार कालपासून नॉट रिचेबल आहेत. हे सगळेच्या सगळेच एकनाथ शिंदेंसोबत आहेत, असा दावा शिंदे स्वतः करत आहेत. कुणावरही जबरदस्ती नाही, मनमर्जीने हे आले आहेत. संजय राऊत यांनी तर काही आमदारांना मारहाण करून सोबत नेल्याचा आरोप केलाय. मात्र राऊतांचा दावा खोटाय, असं एकनाथ शिंदे सांगतायत. तथ्य नेमकं काय आहे, हे काही तासात समोर येईल. पण उस्मानाबादचे कैलास घाडगे पाटील यांनी सूरतच्या मार्गावरून कसं परत आलो, याची सांगितलेली आपबितीही तितकीच धक्कादायक आहे. इकडे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीनेही आपले पती गायब असल्याची तक्रार दिली. त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय. तर सूरतला गेलेले आमदार सूहास कांदेंचीही तब्येत अचानक बिघडलीय. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे आधी सूरत आणि नंतर गुवाहटीत असलेल्या आमदारांमध्येही उद्धव ठाकरेंशी गद्दारी न करण्याची भावना असलेले अनेक आमदार असू शकतात, ही शक्यता नाकारता येणारच नाही!

सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.