Video : औरंगाबादेत शिवसेनेच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याला खरंच मारहाण? शिवसेनेनं थेट सीसीटीव्ही फुटेज दिलं!

मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र भाजपचा आरोप फेटळण्यात येतोय. भाजप कार्यकर्त्याला मारहाण झालीच नसल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Video : औरंगाबादेत शिवसेनेच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याला खरंच मारहाण? शिवसेनेनं थेट सीसीटीव्ही फुटेज दिलं!
औरंगाबाद संदिपान भुमरेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:29 AM

औरंगाबाद : औरंगाबादेत शिवसेनेच्या कार्यालयात एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपकडून गोविंद केंद्रे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र भाजपचा आरोप फेटळण्यात येतोय. भाजप कार्यकर्त्याला मारहाण झालीच नसल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. (CCTV footage of ShivSena’s Sandipan Bhumare’s office after allegations that a BJP worker was beaten)

शिवसेनेच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्याला मारहाण झालीच नाही असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. हा दावा करताना शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचा दाखला दिला जात आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं दिसून येत नाही. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे आणि भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. दरम्यान मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळतेय.

भाजप कार्यकर्ते गोविंद केंद्रे यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर गोविंद केंद्रे यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर सिग्ना रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली होती. मात्र, आता संदीपान भुमरे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादेत अपंग, अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांसाठी लवकरच घरपोच कोरोना लस

औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा पालिका प्रशासकांच्या घरासमोर कचरा टाकू, एमआयएमचा अल्टिमेटम

CCTV footage of ShivSena’s Sandipan Bhumare’s office after allegations that a BJP worker was beaten

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.