Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवेंनी वजन पाहूनच बोलावं, संभाजी महाराजांचा वध शब्द वापरताना लाज वाटली पाहिजे, शहरातल्याच भाजप नेत्यानं सुनावलं….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अंबादास दानवेंनी प्रथमच भूमिका मांडली. मात्र यावेळी बोलताना त्यांनी संभाजी महाराजांचा वध हे असा शब्द वापरला.

अंबादास दानवेंनी वजन पाहूनच बोलावं, संभाजी महाराजांचा वध शब्द वापरताना लाज वाटली पाहिजे, शहरातल्याच भाजप नेत्यानं सुनावलं....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 4:31 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) स्वतःच्या वजनाएवढंच बोलावं, संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) वध हा शब्द वापरताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असं वक्तव्य औरंगाबादच्याच (Aurangabad) भाजप नेत्यानं केलंय. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी दानवेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. औरंगजेब हा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा होता, त्यानेच संभाजी महाराजांचा वध केला, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी आज केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अंबादास दानवेंनी प्रथमच भूमिका मांडली. मात्र यावेळी बोलताना त्यांनी संभाजी महाराजांचा वध हे असा शब्द वापरला. हाच धागा पकडत भाजप नेते संजय केणेकर यांनी दानवेंना सुनावलंय.

शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत युती करून राजकीय सुंता केली आहे. अंबादास दानवे हे संभाजी महाराजांचा वध केला असा शब्द वापरतात. त्यामुळे अंबादास दानवे यांची वैचारिक सुंता झाली आहे का.? वध हा शब्द वापरताना लाज वाटली पाहिजे, असं प्रत्युत्तर केणेकर यांनी दिलंय.

अतुल सावे काय म्हणाले?

भाजपच्या सभेवरील टीका जिव्हारी?

सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबादेत जाहीर सभा झाली. मात्र या सभेला अत्यंत कमी लोक उपस्थित होते. बहुतांश खुर्च्या रिकाम्याच होत्या. याउलट शिवसेनेच्या कीर्तन कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. यावरून अंबादास दानवेंनी भाजपला चांगलंच सुनावलं. रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत.. जे पी नड्डा… बघा हा खड्डा असे म्हणत खिल्लीही उडवली.

औरंगाबादमधील भाजप नेत्यांना ही टीका जिव्हारी लागल्याचे दिसून येतेय. संजय केणेकर यांनी दानवेंच्या वक्तव्याला तितक्याच तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.