औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाकडे? टॉस किंवा चिठ्ठी, की पुन्हा मतदान? आज निर्णय!

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी (Aurangabad Zilha Parishad Election) तहकूब झालेली निवडणूक आज पुन्हा होत आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणाकडे? टॉस किंवा चिठ्ठी, की पुन्हा मतदान? आज निर्णय!
Follow us
| Updated on: Jan 04, 2020 | 11:47 AM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी (Aurangabad Zilha Parishad Election) तहकूब झालेली निवडणूक आज पुन्हा होत आहे.  काल झालेल्या मतदानानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरुन पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेतील दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली आहेत. दोन्ही उमेदवारांना 29 / 29 मतं पडली आहे. दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांची कालची निवड तहकूब करण्यात आलं. आता ही निवड आज (4 जानेवारी) दुपारी 2 वाजता नव्याने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. समान मतं पडल्यामुळे  चिठ्ठी टाकून किंवा टॉस करुन किंवा मग पुन्हा मतदान घेऊन अध्यक्ष निवडणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे या निकालाकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. शिवसेनेने अध्यक्षपद काँग्रेसकडे सोडलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बंडखोर देवयानी डोणगावकर  यांना भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळे बंडखोर देवयानी डोणगावकर विरुद्ध काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांच्यात लढत (Aurangabad Zilha Parishad Election) होत आहे.

राज्यात महाविकासआघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर सत्तास्थापना झाली. त्यानंतर या आघाडीला राज्यात इतर निवडणुकांमध्येही यश मिळालं. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के बसले आहेत. (Aurangabad Zilha Parishad Election). भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेतही फूट पडली. त्यामुळे या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

औरंगाबाद जिल्हापरिषदेतील पक्षीय बलाबल 

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष हा नवा फॉर्म्युला त्यासाठी ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते.

सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य भाजपकडे, शिवसेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1, डेमोक्राटीक 1 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता. त्यानंतर आता अध्यक्षपदावर दावा सांगत शिवसेनेला दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली आहे.

संबंधित बातम्या  

औरंगाबाद जिल्हा परिषदेत दोघांना समान मतं, चिठ्ठी किंवा टॉसने अध्यक्षांची निवड ठरणार

औरंगाबाद जिल्हा परिषदेत धक्क्यावर धक्के, भाजप, शिवसेना, काँग्रेसमध्येही फाटाफूट

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.