Loksabha Election 2024 : अयोध्या, मथुरा आणि काशी, भाजपच्या मिशन 2024 साठी काय योजना?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अयोध्येची जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचप्रमाणे मथुरा आणि काशी या दोन्ही जागांवरही भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. या तिन्ही जागांवर विजय मिळवून देशात भाजपला एक नवा संदेश द्यायचा आहे.

Loksabha Election 2024 : अयोध्या, मथुरा आणि काशी, भाजपच्या मिशन 2024 साठी काय योजना?
pm narendra modi and ram mandirImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 11:07 PM

नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : भाजपच्या स्थापनेपासून राम मंदिर हा सर्वात मोठा मुद्दा हाती घेतला आहे. राम मंदिराचे बांधकाम आता पूर्णत्वास आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर आरएसएस ते भाजपपर्यंत प्रत्येकजण त्याआधी आणि नंतरही मोठ्या मोहिमेची तयारी करत आहे. राम मंदिराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून आगामी लोकसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र, याच दरम्यान भाजपनेही मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरु केलीय.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अयोध्येची जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचप्रमाणे मथुरा आणि काशी या दोन्ही जागांवरही भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. या तिन्ही जागांवर विजय मिळवून देशात भाजपला एक नवा संदेश द्यायचा आहे. त्यासाठीच येथे मातब्बर उमेदवार देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या येते. सध्या भाजपचे लल्लू सिंह हे येथील खासदार आहेत. मात्र त्यांच्या जागी आता मोठ्या नेत्याला निवडणुकीत उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येतून कुठला तरी मोठा चेहरा मैदानात उतरवला जाऊ शकतो आणि लल्लू सिंह पायउतार होऊ शकतात, अशी भाजपमध्ये जोरदार अंतर्गत चर्चा सुरु आहे.

ज्या खासदारांची कामगिरी कमकुवत आहे अशा खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक खासदारांचा सर्वेक्षणातून फारसा चांगला अहवाल आलेला नाही. त्यात राज्य सरकारमधील आणि केंद्रातील काही मंत्र्याचा समावेश आहे. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतला आहे. हायप्रोफाईल उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत मदत होईल असे वातावरण निर्माण होईल, असे पक्षाला वाटत आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे सध्या यूपीच्या लखनौचे खासदार आहेत. दुसरे केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग हे गाझियाबादचे खासदार आहेत. याशिवाय स्मृती इराणी या ही अमेठी मतदारसंघाच्या खासदार आहेत. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये त्या मंत्री होत्या. तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. अशा परिस्थितीत अयोध्येमधून प्रसिद्ध चेहऱ्याला रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. कारण भाजपने ही जागा हायप्रोफाईल केली आहे.

राज्यसभेतील खासदारांनाही निवडणुकीत उतरविणार?

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काही खासदारांना आमदारकीचे तिकीट दिले होते. तीच खेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप खेळणार आहे. राज्यसभेतील काही खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार आहे. यामध्ये पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, भूपेंद्र यादव आदी नेत्यांचा समावेश आहे.

शक्य तितक्या मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढविल्यास निवडणुकीच्या वातावरणात आघाडी मिळवू शकतो अशी यामागची रणनीती आहे. याशिवाय त्यांचा विजय झाल्यास राज्यसभेवर ज्यांनी आतापर्यत संघटनेत विशेष योगदान दिले आहे अशांना स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला बळ आणण्यासाठी मोठे नेते निवडणुकीत उतरवायचे आणि राज्यसभेतही नवे चेहरे दाखल करून घ्यायचे अशी ही भाजपची खेळी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.