Marathi News Politics Azaan loudspeaker issue in maharashtra Sandeep Deshpande gives that to muslim brothers as they follow rules after Raj Thackeray advise
Loudspeaker Row : मनसे नेत्यांनीच मान्य केलं, मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली! ना अजान वाजली, ना हनुमान चालिसा
Azaan Loudspeaker Controversy LIVE Updates : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी शांततेत अजान पार पडली. तसंच बहुतांश ठिकाणी भोंग्यामधून अजान वाजली नाही.
संदीप देशपांडे, मनसे नेतेImage Credit source: TV9 Marathi
मुंबई : बुधवारची सकाळ कशी असेल, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. पहाटे पहाटे केली जाणारी अजान आणि त्याला हनुमान चालिसेनं (azaan loudspeaker issue) उत्तर देण्यासाठी सज्ज असलेले मनसैनिक यांच्यात नेमकं काय होतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राची (Maharashtra Politics) नजर लागली होती. मात्र बहुतांश ठिकाणी अजान भोंग्यावर झालीच नसल्यानं हनुमान चालिसाही वाजवली गेली नाही. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुस्लिम बांधवांचं मनापासून अभिनंदनही केलंय आणि मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुकही केलंय. माहित, पनवेलसह नाशिक आणि इतरही राज्यातील काही भागात भोंग्यावर अजान वाजली नाही. त्यामुळे हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रश्नच नव्हता, असंही ते म्हणालेत. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्यासोबत केलेल्या बातचीतीदरम्यान संदीप देशपांडे बोलत होते. मुस्लिम दाम्पत्यानं दाखवलेल्या समंजसपणाचं संदीप देशपांडे यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. तसंच राज ठाकरेंच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं त्यांनी मुस्लिम बांधवांचे आभारही मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय, की…
आज अजान बऱ्याच ठिकाणी वाजली नाही..म्हणून हनुमान चालीसा वाजवली नाही. माहिम, पनवेल , नाशिकमध्ये अजान वाजली नाही. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो.. त्यांनी हा विषय धार्मिक न मानता सामाजिक समजून राज ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या पद्धतीनं खोटा प्रचार राज ठाकरेंबाबत केला, त्याला मुस्लिम बांधवांनीच उघडं पाडलं. राज ठाकरेंनी सामाजिक मुद्दा चर्चेला आणला आणि त्याचा आता निकाल लागलेला दिसतोय. राज ठाकरेंच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. मुस्लिम बांधवांनी जो समजसपणा दाखवला तो कौतुकास्पद आहे.
दरम्यान, यावेळी संदीप देशपांडे यांच्यासोबत असलेल्या संतोष धुरी यांनी देखील मुस्लिम बांधवांच्या भूमिकेचं कौतुक केलंय.सामाजिक बांधिलकी हिंदुस्थानाती मुस्लिम बांधवांनी जपली, ती कौतुकास्पद आहे, त्यांचे आभार मानायला पाहिजे, असं मनसे नेते संदीप धुरी यांनी म्हटलंय. मुस्लिम बांधवांनी सरकारला चपराक दिली. पण त्यांनी स्वतःहून भोंगे वाचवले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, असंही ते म्हणालेत.
बहुतांश ठिकाणी भोंगे म्युट…
मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी शांततेत अजान पार पडली. तसंच बहुतांश ठिकाणी भोंग्यामधून अजान वाजली नाही. त्यामुळे मनसैनिकांनीही हनुमान चालिसा वाजवण्याचा मुद्दाही उपस्थित होण्याचा प्रश्न नव्हता. काही ठिकाणी जिथं अजान ऐकू आली, तिथं अजानला हनुमान चालिसेनं उत्तर द्यायलाही मनसैनिक विसरले नव्हते.
काहींची धरपकड
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काही मनसैनिकांची धरपकड केली आहे. तर बहुतांश जणांना नोटीसा बजावल्या आहेत. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशानं पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.