…तर अपक्षांनाही उपमुख्यमंत्रिपद द्या, बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केलाय. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, असं म्हटलंय.

...तर अपक्षांनाही उपमुख्यमंत्रिपद द्या, बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला
बच्चू कडू, राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 4:29 PM

वर्धा: काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केलाय. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केलीय. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस पाच होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी व्यक्त केली. ते वर्धा येथे स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. (Bacchu Kadu comment on Manikrao Thackeray demand of deputy chief minister for congress)

शेतकऱ्यांचा उद्रेक होईल

आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, असंही कडू यांनी म्हटलंय. या आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातल सर्वात मोठं आणि सर्वात जास्त संख्येत असलेलं आंदोलन आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिच आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे मोदींनी स्पष्ट करावं. कायदे मागे घेतल्यान शेतकऱ्यांच काहीच नुकसान होणार नाही तर होणार कोणाचं नुकसान हे स्पष्ट करावं. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला असं वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये , आपण त्या शेतकऱ्यांच्या मतदानावर भूलथापा देऊन दोन वेळा निवडून आले आहे, अस आता चालणार नाहीय. असच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित आहे अशी प्रतिक्रिया दिलीय.

भाजप आमदार फुटू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिडी शिवाय फासे पलटवू, अस वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा कडू यांनी चांगलाच समाचार घेतलाय. फडणवीसांना असं म्हटल्याशिवाय जमणार नाही. त्यांच्या कडील आमदारांची महाविकास आघाडीकडे येण्यासाठी रांग लागली आहे. त्यांना त्या आमदारांना पक्षात ठेवायचं आहे. “जाऊ नका बाबा आपलं सरकार येत असं त्यांना हे बोलत राहावं लागतं. फडणवीसांच ते वक्तव्य आमच्या साठी नाही ते त्यांच्यासाठी आहे.त्यांचे आमदार फुटू नये म्हणून असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

नाना पाटोले यांनी राजीनामा दिल्या नंतर वेगवेगळ्या चर्चना उधाण आले आहे.आज सामनामध्ये पण राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं अधोरेखित केले आहे. यावर कडू यांनी प्रतिक्रिया देत हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष त्या लेवलचा प्रश्न आहे. या संदर्भात सामनामध्ये लेख आला असेल तर अधिवेशनाच्या अगोदर आता पुन्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर थोडी अडचणी सरकार समोर आहे.त्यापुरतं हे वक्तव्य आहे.एवढं मनाला लावून घ्यायची गरज नाही असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

गोटे म्हणाले, स्वत:चं पोर हवं, कमरेत जोर आहे, मुख्यमंत्री म्हणतात…

सदसदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? न्यायालयाचे दोन निकाल तुमची कामगिरी सांगते, फडणवीसांचा हल्लाबोल

(Bacchu Kadu comment on Manikrao Thackeray demand of deputy chief minister for congress)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.