दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. (Bacchu kadu Raosaheb Danve)

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 11:12 PM

मुंबई : “रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. (Bacchu kadu criticizes Raosaheb Danve on his controversial statement)

“रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली. यावेळी दानवे यांच्या घरासमोर पोलीसही तैनात करण्यात आले होते. (Bacchu kadu criticizes Raosaheb Danve on his controversial statement)

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर (farmers protest) त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर दानवे ( Raosaheb Danve) यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. बच्चू कडू यांनीही त्यांचं बोलण दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेश सीमेवर बच्चू कडू यांचा ताफा रोखला; यूपी पोलिसांची दडपशाही

जियो सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही : आंदोलक शेतकरी

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

(Bacchu kadu criticizes Raosaheb Danve on his controversial statement)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.