“रवी राणांसोबत बैठक करायची माझी इच्छा नाही, पण…”, मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी बच्चू कडू यांचं विधान
आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं विधान केलंय....
अमरावती : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. आज रवी राणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहेत. या भेटीत या वादावर चर्चा होणार आहे. तर बच्चू कडूदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत जाणार आहे. याआधी टीव्ही 9 मराठीशी बोतलाना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझी आमदार रवी राणा सोबत बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहू, असं बच्चू कडू (Bacchu kadu) म्हणालेत.
एक तारखेच्या अल्टीमेंटममध्ये सध्या फेरबदल नाही. रवी राणा उत्तर जर समाधानकारक मिळालं तरच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ, असंही बच्चू कडू म्हणालेत.
रवी राणा यांच्या विधानाने मोठी बदनामी झाली आहे. त्या पद्धतीने उत्तर आलं तर तोडगा निघेल, अन्यथा आमचा अल्टिमेटम आहेच!, असं बच्चू कडू म्हणालेत.
राणा जे बोलले त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असंही ते म्हणालेत. शिवाय बच्चू कडू यांच्या भूमिकेला काही नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, गुलाबराव पाटील यांच्यासह ज्या नेत्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
आज दुपारी तीन वाजता रवी राणा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहेत. तर संध्याकाळी आठ वाजता बच्चू कडू शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.
‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’, कुणाचंही नाव न घेता असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी हा टोला नाव न घेता रवी राणा यांना लगावला आहे.