बच्चू कडू यांचं रोखठोक उत्तर, होय गद्दारी केली, वेळोवेळी करेन!! ‘त्या’ Video वरून शिंदेंसोबत का गेलो, याचं दिलं सविस्तर उत्तर!
प्रहार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बच्चू कडूला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आपल्याकडे पहावं. बापापेक्षा नेत्यावर जास्त निष्ठा आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.
स्वप्निल उमप, अमरावती : 80 वर्षाच्या शेतकऱ्याने बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा ताफा अडवून त्यांना थेट सवाल केला. तुम्ही गद्दारी का केली? धाराशिवमध्ये घडलेल्या या पॉलिटिकल ड्राम्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात आहे. शेतकऱ्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. विशेषतः शिवसेनेकडून या व्हिडिओवर भाष्य केलं जातंय. आता जनताही तुम्हाला विचारतेय, असं संजय राऊत म्हणाले. या व्हिडिओवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू यांनी यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. होय आम्ही गद्दारी केली. नेत्याशी, पक्षाशी केली. मात्र जनतेसाठीच ही गद्दारी केली, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. तसेच आपण उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली, यावरूनही स्पष्टीकरण दिलंय.
त्यांना कुणीतरी पाठवून दिलं?
धाराशिवमध्ये प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला कुणीतरी पाठवून दिलं, असा संशय बच्चू कडू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ ते आमच्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत २-३ मिनिटं चर्चा केली. परंतु त्यांची मानसिकता चर्चा करायची नव्हती. त्या काकांची. ते कुणीतरी पाठवून दिलेल्यापैकी असावेत, असं चित्र होतं. पण एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उद्धव शाहेबांना सोडून का गेले… असं ते म्हणत होते, यावरून बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं.
‘शिवसेनेत अन्याय झाला’
बच्चू कडू म्हणाले, ‘ मी शिवसेनेत असताना आमच्यावर जेव्हा अन्याय झाला. त्यावेळी इथले पालकमंत्री भाजपाचे होते. आम्ही शिवसेनेचे होते. आमच्यावर केसेस झाल्या. तेव्हा शिवसेनेकडून न्याय मिळाला नाही. शौचालय भ्रष्टाचार प्रकरण झालं. त्यात जेव्हा वरिष्ठांकडून न्याय भेटत नाही, हे पाहून आम्ही शिवसेना सोडली. प्रहार पक्ष स्थापन केला. २५ वर्षांपासून काम करतोय. आमचे स्वतःचे २ आमदार निवडून आले. हे शिवसेनेच्या ताकतीवर आले नाहीत. शिवसेनेच्या भरोशावर आणले नाहीत. शिवसेना सोडून एवढी वर्ष झाल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर, साडेतीनशे गुन्हे दाखल झाल्यानंतर १०० वेळा रक्तदान केलंय… कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून दोन आमदार निवडून आले आहेत, असं बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितलं..
2019 साली काय घडलं?
बच्चू कडू म्हणाले, ‘ आम्ही देवेंद्र फडणवीसांकडे गेलो. त्यांनी पाठिंबा मागितला होता. पण त्यांच्या शर्थी-अटी होत्या. आम्ही मान्य केल्या नाहीत. मग उद्धव साहेबांकडे गेलो. त्यावेळी ते भाजप-शिवसेना युतीकडून लढले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं त्यांना वाटलं. त्यांनी आम्हाला बोलावलं. शिंदेसाहेब सोबत होते. त्यांनी आग्रह केला. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर बळ भेटेल, म्हणाले. शिवसैनिकाचं जुनं नातं म्हणून आम्ही उद्धव साहेबांना पाठिंबा दिला. त्यांनी कॅबिनेट मंत्र्याचा शब्द दिला होता. राज्यमंत्री केलं. त्याबद्दल वाइट वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
व्हायरल झालेला तो व्हिडिओ…
होय गद्दारी केली..
गद्दारीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘ काही लोकं म्हणतात, आम्ही गद्दारी केली. होय. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही नेत्यासोबत, पक्षासोबत गद्दारी केली तर होय. पण जनतेसोबत गद्दारी करणार नाही. उद्धव साहेबांसोबत राहिलं तर प्रामाणिक आहोत, असं वाटत असेल तर चे चुकीचं आहे. त्याने त्यांच्या पक्षाचं राजकारण करावं. आमचा पक्ष छोटा असला तरीही आम्हाला ते मतदार संघाच्या सोयीचं किती आहे, त्या गद्दारीतून आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं. त्या गद्दारीला शाबासकी देतो. जनतेसाठी ही गद्दारी वेळोवेळी करणार. प्रहार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बच्चू कडूला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आपल्याकडे पहावं. बापापेक्षा नेत्यावर जास्त निष्ठा आहे. ..