जानेवारीपासून शाळा, उन्हाळ्याची सुट्टी रद्द, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंचा प्रस्ताव
उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यंमंत्र्याना दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
अमरावती : “कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत (Schools May Be Starts From January). तर ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याची काही गरज नव्हती. कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते”, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. त्याशिवाय, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन, जानेवारी महिन्यापासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यंमंत्र्याना दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं (Schools May Be Starts From January).
“कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरु झाल्या नाहीत. तर ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती. कारण, यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते. शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे, सर्वांना समान मिळालं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले (Schools May Be Starts From January).
“आमच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात पाच ते सहावेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्या आहेत. यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे. सर्वांना 100 टक्के शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी रद्द करुन जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात याव्या, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू यांनी दिलेल्या माहितीनंतर जानेवारी महिन्यापासून सर्व शाळा सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?https://t.co/AE5sTtUmXY#Unlock4 #PMNarendraModi #CoronavirusInIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2020
Schools May Be Starts From January
संबंधित बातम्या :
आधी बोगस बियाणे, आता पिकांवर रोग, राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का?, बच्चू कडूंचा सरकारला सवाल