बच्चू कडू यांना न्यायालयाने ठोठावला ‘इतका’ दंड;…तर जामीनही होणार रद्द!

| Updated on: Oct 21, 2022 | 3:17 PM

आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. उस्मानाबाद न्यायालयाकडून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

बच्चू कडू यांना न्यायालयाने ठोठावला इतका दंड;...तर जामीनही होणार रद्द!
Follow us on

उस्मानाबाद :  मोठी बातमी समोर येत आहे. आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांना न्यायालयाने (Court) दंड ठोठावला आहे. उस्मानाबाद (Osmanabad) न्यायालयाकडून त्यांना दंड ठोठावण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात बच्चू कडू यांना एकूण 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन जणांना देखील न्यायालयाने दंड ठोठवला आहे. तसेच यापुढे जर सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्यात येईल अशी तंबी देखील न्यायालयाने बच्चू कडू यांना दिली आहे. 14 जानेवारी 2019 पासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनादरम्यान वाद झाला होता. हे प्रकरण  14 जानेवारी 2019 पासून  प्रलंबित आहे. प्रकरण 14 जानेवारी 2019 पासून प्रलंबित असल्यानं न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात बच्चू कडू यांना पाच हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन जणांना देखील दंड ठोठावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

…तर जामीन रद्द

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात बच्चू  कडू यांच्यासह अन्य तिघांना उस्मानाबाद न्यायालयाने दंड ठोठवला आहे. तसेच यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन देखील रद्द करू अशी तंबी देखील न्यायलयाने दिली आहे. हे प्रकरण 14 जानेवारी 2019 पासून प्रलंबित असल्यानं न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत.