Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी स्वत: पक्ष चालवावा; बाळा नांदगावकरांचा राऊतांवर निशाणा

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीसह मनसेला आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे नांदगावकर यांनी तुळजाभवानी चरणी घातले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा केली.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी स्वत: पक्ष चालवावा; बाळा नांदगावकरांचा राऊतांवर निशाणा
अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी स्वत: पक्ष चालवावा; बाळा नांदगावकरांचा राऊतांवर निशाणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 3:07 PM

उस्मानाबाद: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचा पराभव झाल्याने शिवसेनेवर (shivsena) टीका होऊ लागली आहे. आता मनसेनेही शिवसेनर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये, असा खोचक सल्ला देत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली. मनसे नेते बाळा नांदगावकर उस्मानाबादला आले होते. सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी ते आले असता मीडियाशी संवाद साधत होते. बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्वी सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. काही लोक स्वतःला पक्ष प्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे, असंही नांदगावकर म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीसह मनसेला आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे नांदगावकर यांनी तुळजाभवानी चरणी घातले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा केली. याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा संघटक अमर राजे कदम, आबासाहेब ढवळे, राजेंद्र गपाट, शाहूराज माने, पाशा शेख, बाळासाहेब कोठावळे, दादा कांबळे, महेश जाधव, विद्यार्थी सेनेचे निलेश जाधव उपस्थित होते. यावेळी नांदगावकर यांनी राज्यसभेच्या पराभवावरून शिवसेनेला टोला लागावला. राज्यसभेच्या निकलापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षाही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. तसेच विधान परिषदेत योग्य ते घडेल असे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. शिवसेना मनसे युती हा विषय आता इतिहास जमा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार

आगामी महानगरपालिका व इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. मनसे आपली लढाई स्वबळावर लढेल आणि निवडून येणारं असल्याचे भाकीत त्यांनी केले. बाळा नांदगावकर यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली. आम्ही आधीही एकला चलो रे होतो, आज ही एकला चलो रे आहोत. कार्यकर्ताना स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असे स्पष्ट आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हिंदू नवनिर्माण सेना नामकरणाची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र बाहेर राजकीय विस्तार करणार नाही. यूपी, बिहार, झारखंड या राज्यातून मनसे पक्ष स्थापन करण्याची मागणी होत आहे. मात्र आम्ही महाराष्ट्रातच लक्ष घालणार आहोत व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून आदर्श निर्माण करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐवजी हिंदू नवनिर्माण सेना करा अशी मागणी होते आहे. मात्र आम्ही महाराष्ट्र पुरतेच काम करणार आहोत. मनसेची वाढ महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात झाली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

शिवभोजन योजनेचे कौतुक

शिवभोजन योजनेचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कौतुक केले. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विषयी लोकात आपुलकी राहिली नाही, असे मत नांदगावकर यांनी व्यक्त केले.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....