‘गळफास घेण्याचा प्रयत्न हा स्टंट नव्हता’, महावितरणच्या वीज तोडणी विरोधात बाळासाहेब मुरकुटे पुन्हा आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात 300 पेक्षा अधिक रोहित्र महावीतरणने बंद केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन दिवसांपुर्वी या प्रश्नावर विज वितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करूनही अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या मुरकुटे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

'गळफास घेण्याचा प्रयत्न हा स्टंट नव्हता', महावितरणच्या वीज तोडणी विरोधात बाळासाहेब मुरकुटे पुन्हा आक्रमक
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा वीज वितरण कंपनीला इशारा
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 3:54 PM

अहमदनगर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी दोन दिवसांपूर्वी वीज वितरण (Electricity Department) कार्यालयातच गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केला होता. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी बाळासाहेब मुरकुटे यांना वेळीच रोखल्यानं पुढील अनर्थ टळला. मुरकुटे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतरही महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करत आहेत. त्यामुळे मुरकुटे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात 300 पेक्षा अधिक रोहित्र महावीतरणने बंद केल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन दिवसांपुर्वी या प्रश्नावर विज वितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करूनही अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या मुरकुटे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत आहेत. शेतकऱ्यांना शेती तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. काही रक्कम भरण्यास शेतकरी तयार आहेत. मात्र वीज कंपनी आडमुठे धोरण अवलंबत असल्याने संताप व्यक्त होत आहे. गळफास घेण्याचा प्रयत्न हा स्टंट नव्हता, असं सूचक इशाराही मुरकुटे यांनी वीज वितरण कंपनीला दिलाय.

राज्य सरकारने शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा

नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे नुकसान झाले. कोरोना काळात शेतमालाला भाव मिळू शकला नाही. कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च झाले. अशावेळी आता कृषी पंपाची विज कट झाल्याने हाताशी आलेले पिक धोक्यात आलं आहे. तसंच जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

नेवासा वीज वितरण कार्यालयात नेमकं काय घडलं?

अहमदनगरात कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. दोन दिवसांपूर्वी नेवासा येथे वीज वितरण कार्यालयाच्या परिसरात शेतकऱ्यांसह माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आंदोलन केलं. कृषीपंपांची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. आंदोलन करुनदेखील मागण्या मान्य होत नाहीत. महावितरणचे अधिकारीही दाद देत नाहीत. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना इतर लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या मुरकुटे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इतर बातम्या : 

‘राष्ट्रवादीचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार’, शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोपावर जयंत पाटील काय म्हणाले?

एसटी कर्मचाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पाहून कठोर निर्णय, परिवहन मंत्री परबांचा इशारा; तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.