बाळासाहेब ठाकरे जयंती : उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसैनिकांशी संवाद साधणार, महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार?
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरे आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 पालिका निवडणुका काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती. यानिमित्ती महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्षासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) थोड्याच वेळात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते शिवसैनिकांनी काय मार्गदर्शन करणार?, त्याचबरोबर विरोधकांच्या टीकेला कोणत्या शब्दात प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरे आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 पालिका निवडणुका काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/VFXRD18ZY5
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 23, 2022
मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मधल्या काळात मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणासाठी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानावरुन राज्याचा गाडा हाकत आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या बैठका, कार्यक्रम आणि हिवाळी अधिवेशनातही सहभागी होऊ शकले नाहीत. त्यावरुन भाजप नेते मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. या टीकेला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी केली होती. तर काही नेत्यांनी राज्याचा कारभार अजित पवारांकडे सोपवण्याची मागणी केली होती, त्यावरही उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसणार – आदित्य ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. विरोधी पक्षाकडे न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :