शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, आता नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले राणे?

काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. शिवसैनिकांच्या या कृतीवर आता नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत:चं शुद्धीकरण करण्याचा खोचक सल्ला दिलाय.

शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण, आता नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले राणे?
नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 10:59 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. शिवसैनिकांच्या या कृतीवर आता नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत:चं शुद्धीकरण करण्याचा खोचक सल्ला दिलाय. (Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray over Purification of Balasaheb Thackeray’s memorial)

‘मी विमानतळावर उतरलो बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. नंतर शिवाजी पार्कवर वीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मी नतमस्तक झालो. मी आज जे आहे ते बाळासाहेबांमुळेच. स्मारकाच्या ठिकणी नतमस्तक होऊन, मी साहेब आपण आज असायला हवे होता असं म्हणालो. आजच्या राज्यकर्त्यांकडे मनाचे मोठेपण असायला हवं होतं. साहेबांचे स्मारक पाहिले आणि दुःख झाले. सुशोभीकरण करण्या इतपत पुत्राकडे पैसे नसावेत. मी तिथून निघालो आणि पाच-सहा टाळकी तिथं गेली. तिथे गोमुत्र शिंपडलं, शुद्धीकरण केलं. काय मोठं काम केलं. स्वतः जायचं होतं गोमुत्र घेऊन. आधी मनाचे शुद्धीकरण करा. जागेचे शुद्धीकरण करायला जे शिंपडले ते स्वत: घ्या. स्वतःचे शुद्धीकरण करा जरा’, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

‘गोमुत्र शिंपडण्यापेक्षा लोकांसाठी रोजगार निर्माण करा’

32 वर्षात मुंबईचे सिंगापूर का केले नाही? जा सिंधुदुर्गात बघा ते रस्ते कसे आहेत. सिंधुदुर्गात शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल सुरु केले. ठाकरे नावाचे एक तरी कॉलेज, हॉस्पिटल का काढले नाही? शिवसेना ही कोकणी माणसानं वाढवली. शेवटपर्यंत साहेबांच्या सोबत त्यांना संरक्षण द्यावे म्हणून राहिलो. वर्षावर मी राहून गेलो तिथे गोमुत्र शिंपड. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर मी बसलो शिंपड तिथेही गोमुत्र शिंपड, दुष्काळग्रस्त भागासाठी 10 हजार दिले फक्त. सगळे म्हणतात तुम्ही तीव्र टीका करता. मग काय सौम्य टीका करू का? मातोश्रीवर बसून मांत्रालय चालवत आहेत. राज्यात लाखोंने मृत्यू झाले. सरकारी हॉस्पिटल, कोरोना वार्डमध्ये डॉक्टर नाहीत. लाखो लोकांचा जीव राज्य सारकारमुळे गेला. गोमुत्र शिंपडण्यापेक्षा लोकांसाठी रोजगार निर्माण करा, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.

‘मुंबई महानगरपालिका सेनेच्या उदरनिर्वाहाचं साधन’

मुंबई महानगरपालिका सेनेच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कंत्राटदाराकडून पैसे वसूल केले जात आहेत. तुम्ही सत्तेवर बसला आहात, जनाची नाही पण मनाची तरी बाळगा. मला सांगावे भ्रष्टाचार ओपन करायला सांगा मी उद्या पासून करेल. बाळासाहेब मला माझा नारायण म्हणायचे. आज ही ते मला माझा नारायण म्हणाले असते, अशी भावना राणे यांनी यावेळी व्यक्त केली. सगळ्यामध्ये पार्टनर होऊन उंच इमारती उभ्या केल्या. मराठी माणसाला परवडतील अशी घरे उभी केली नाही. निर्मला सीतारामन यांनी विचारले तुमची वाढ किती टक्के आहे? त्याचे उत्तर काय तर हमारे सेक्रेटरी है, उन्हे पता है. मैं नही देखता!, असा टोलाही राणेंनी लगावलाय.

शिवसैनिकाकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण!

नारायण राणे यांनी सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी आप्पा पाटील नावाच्या शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून आणि दूधाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केलं. आप्पा पाटील हे आपल्या दिवसाची सुरुवात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर वंदन करुन आणि फुलं वाहून करतात. त्यानंतरच ते आपल्या कामाला सुरुवात करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी कट्टक शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

स्मृतीस्थळ शुद्धीकरणाचा वाद पेटला, भाजप नेते म्हणतात, शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज, का?

आधी नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, आता शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!

Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray over Purification of Balasaheb Thackeray

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.