आणीबाणीला संघाचाच पाठिंबा, अमित शाह यांचं तेव्हा वय काय होतं?; संजय राऊत यांचा तुफान हल्ला

भाजपकडे काम नाही. आणीबाणीला 50 वर्ष झाली आहेत. लोक आणीबाणीला विसरले आहेत. काही लोक देशात अराजकता माजवत होते. रामलीला मैदानातून घोषणा झाली होती. सरकारच्या आदेशाचं पालन करू नका, असं आर्मीला सांगण्यात आलं होतं. पोलीस दलाला भडकावलं जात होतं. सरकारी आदेशाचं पालन करू नका म्हणून सांगितलं जात होतं. अशावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर त्यांनीही आणीबाणी लावली असती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आणीबाणीला संघाचाच पाठिंबा, अमित शाह यांचं तेव्हा वय काय होतं?; संजय राऊत यांचा तुफान हल्ला
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 12:03 PM

केंद्र सरकारने आणीबाणीचा निषेध म्हणून दरवर्षी 25 जून रोजी संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी तर मोदी सरकार आल्यापासून देशात रोजच कशी संविधानाची हत्या चालू आहे याची आकडेवारीच सादर केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयावर कठोर हल्ला चढवला आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानचे आणीबाणीला पाठिंबा दिला होता, असं सांगतानाच आणीबाणीबद्दल अमित शाह यांना काय माहीत आहे? तेव्हा त्यांचं वय तरी काय होतं? असा सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या 10 वर्षातील मोदींच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. त्यामुळे ते कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात हे पाहावं लागले. आणीबाणीच्या संदर्भाने म्हणणार असेल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि बाळासाहेब ठाकरे होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून मते मागता? फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यावर काय म्हणणं आहे ते सांगा

हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यसाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलली पाहिजे, अशा प्रकारची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन करताना परखड भूमिका होती. यावर अमित शाह आणि मोदींचं काय म्हणणं आहे ते सांगा? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शाह यांचं वय काय होतं?

आणीबाणी हे देशाच्या संरक्षणाचं प्रकरण होतं. काही लोक देशात बॉम्ब बनवत होते आणि स्फोट घडवून आणत होते. हे सर्वांना माहीत आहे. अमित शाह यांना आणीबाणी काय आहे माहीत नाही. तेव्हा त्यांचं वय काय होतं माहीत नाही. आज ते ज्या नकली शिवसेनेसोबत बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण गात आहेत, त्या बाळासाहेबांनीच त्यावेळी आणीबाणीला जाहीर पाठिंबा दिला होता. आणीबाणीचं मुंबईत स्वागत केलं होतं. संघानेही समर्थन केलं, असं राऊत म्हणाले.

हे कोण टिक्कोजीराव

आणीबाणीनंतर जनता पार्टीचं सरकार आलं. जनता पार्टीला संविधानाची हत्या झाल्याचं वाटलं नाही. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं, त्यांनाही संविधानाची हत्या झाली असं वाटलं नाही. चंद्रशेखर पंतप्रधान बनले, त्यांना वाटलं नाही संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिक्कोजीराव? त्यांच्याकडे बहुमत नाही. लोकांनी त्यांना नाकारलं. त्यांचं दिमाग ठिकाण्यावर नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

संविधान बदलणार होते म्हणूनच नाकारलं

कायदा, सेंट्रल एजन्सी, भ्रष्टाचार आणि अराजकता देशात वाढली आहे. ही संविधानाची हत्याच आहे. मोदी आणि भाजपला बहुमत मिळालं नाही. याचं कारण ते संविधान बदलणार होते. संविधान बदलणार होते म्हणूनच त्यांना जनतेने नाकारलं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.