शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मातोश्रीवर ज्या माणसाच्या हातचं जेवण आवडायचं, तो शिंदे गटात दाखल

चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती होते. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मातोश्रीवर ज्या माणसाच्या हातचं जेवण आवडायचं, तो शिंदे गटात दाखल
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 6:13 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत असतानाच उद्धव ठाकरे आणखी एक जबरदस्त झटका बसला आहे. बाळासाहेबांची(Balasaheb Thackeray) सावली अशी ओळख असलेल्या चंपासिंह थापा(Champa Singh Thapa ) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

चंपासिंह थापा हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती होते. चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केल्यानंतर थापा यांनी उद्धव ठाकरेंसह न राहता शिंदे सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

थापा यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंचे विचार न पटल्याने थापा यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांच्या सोबत

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर चंपासिंह थापा चर्चेत आले. थापा हा बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबतच होता. बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा संवाद थापा याच्यांशीच केला होता.

भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे थापा हे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले.  थापा हे बाळासाहेबांची सावली बनून त्यांच्या सोबत राहिले होते.

बाळासाहेबांनी थापा यांना कायम मातोश्रीवर ठेवण्याचे उद्धव ठाकरेंना सांगीतले होते. थापा यांना बाळासाहेबांनी  कुटुंबातील सदस्याचा दर्जा दिला होता.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.