साताऱ्यात निवडून यायला चव्हाणांना पवारांची मदत लागते, तर हरकत काय? : थोरात
एकमेकांच्या ताकदीने आम्ही जिंकलो, हे राष्ट्रवादीही मान्य करते. त्यामुळे हरकत काय?" असा प्रतिप्रश्न बाळासाहेब थोरात यांनी केला.
मुंबई : “काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे मदत केल्यास हरकत काय?” असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला. साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले होते. (Balasaheb Thorat answers Saamana Editorial claims of Sharad Pawar helping Prithviraj Chavan)
“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभा निवडणूक लढवली होती. एकमेकांच्या ताकदीने आम्ही जिंकलो, हे राष्ट्रवादीही मान्य करते. त्यामुळे मदत होत असेल, हे नक्की. तर त्यात हरकत काय?” असा प्रतिप्रश्न बाळासाहेब थोरात यांनी केला.
‘सामना’च्या अग्रलेखात काय?
“पृथ्वीराज चव्हाण, मिलींद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेसला कायमस्वरुपी सक्रीय अध्यक्ष हवा, अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी, याची गंमत वाटते.” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखात लगावला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश आहे.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल
“देश संकटाच्या खाईत गटांगळ्या खात असताना काही लोकांना राजकारण सुचते कसे हा प्रश्नच आहे. कॉंग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थंडावले आहे असे दिसते. (Balasaheb Thorat answers Saamana Editorial claims of Sharad Pawar helping Prithviraj Chavan) मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता कॉंग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे का? ज्यांनी पत्र लिहिले त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यातील एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरील देखील लोकांचा नेता नाही. पी चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुने जाणते आहेत. सिब्बल यांनी अनेक वर्ष पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळली, पण या घडीला राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम मॅनेजर किंवा सल्लागार आहेत, पण लोकनेते नाहीत.” असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
“सरकार दूध उत्पादकांच्या बाजूने”
दरम्यान, दूधासाठी सरकारने मदत केली. आम्ही निर्णय घेत आहोत. काही राजकीय पक्ष हे आंदोलन राजकीय हेतूने करत आहेत. मात्र सरकार दूध उत्पादकांच्या बाजूने आहे, अशी हमी बाळासाहेब थोरातांनी दिली.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 27 August 2020 https://t.co/TOikdzGRKQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2020
(Balasaheb Thorat answers Saamana Editorial claims of Sharad Pawar helping Prithviraj Chavan)