Balasabeb Thorat : चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला

दोन वर्षापुर्वी आलेल्या कोरोना संसर्गात महाविकास आघाडी सरकारने आदर्श काम केलं आहे. एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात, अडचणी असतात. त्याचबरोबर काम झालं पाहिजे.

Balasabeb Thorat : चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला
बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:25 PM

मुंबई – काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात (Balasabeb Thorat) यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) अभिनंदनाच्या भाषणात भाजपसह बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. सतत गर्दीत राहणारं व्यक्तिमत्त्व तुमचं आहे. तुमचं भरपूर कौतुक व्हायला हवं, चांगलं कामचं तुम्हाला अडचणीत आणतंय, असा बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, आपली ज्येष्ठ मंडळी कोणत्याही पक्षाची असोत. त्यांना कायम आदराचं स्थान द्यायचं, लहानसहान माणसं मानाच्या पदावर नको ते बोलून जातात. या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातून (Maharashtra) अशी चुकीचे पायंडे पडता कामा नये असं थोरात यांनी आमदारांना आवाहन केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो असं त्यांनी सत्ताधाऱ्यांना आवर्जुन सांगितलं.

एक नवा इतिहास नोंदवला जातोय, यावर पुस्तकं लिहिली जातील.

दोन वर्षापुर्वी आलेल्या कोरोना संसर्गात महाविकास आघाडी सरकारने आदर्श काम केलं आहे. एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात, अडचणी असतात. त्याचबरोबर काम झालं पाहिजे. यासाठी किती आमदारांमध्ये तणाव असतो. हे सगळं माहिती आहे असाही टोला बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात लगावला. महाविकास आघाडीत कुणीही कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. हा बदल तुम्ही करत असताना तो एक नवा इतिहास नोंदवला जातोय. यावर पुस्तकं लिहिली जातील. तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली. याचं वाईट वाटतं अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झालंय.

मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला, पर्यावरणवादी तिथे निर्णय घेतलाय, त्याचा तुम्हाला फेरविचार करावा लागेल असं आवाहन बाळासाहेब थोरातांनी सांगितलं. महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही. पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कर्जाची व्यवस्था नाही. या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झालंय.

हे सुद्धा वाचा

राज्याने पिण्याच्या पाण्यासाठी तातडीनं बैठक घ्यावी असं देखील आवाहन थोरातांनी केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.