मुंबई – काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात (Balasabeb Thorat) यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) अभिनंदनाच्या भाषणात भाजपसह बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. सतत गर्दीत राहणारं व्यक्तिमत्त्व तुमचं आहे. तुमचं भरपूर कौतुक व्हायला हवं, चांगलं कामचं तुम्हाला अडचणीत आणतंय, असा बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, आपली ज्येष्ठ मंडळी कोणत्याही पक्षाची असोत. त्यांना कायम आदराचं स्थान द्यायचं, लहानसहान माणसं मानाच्या पदावर नको ते बोलून जातात. या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातून (Maharashtra) अशी चुकीचे पायंडे पडता कामा नये असं थोरात यांनी आमदारांना आवाहन केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो असं त्यांनी सत्ताधाऱ्यांना आवर्जुन सांगितलं.
दोन वर्षापुर्वी आलेल्या कोरोना संसर्गात महाविकास आघाडी सरकारने आदर्श काम केलं आहे. एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात, अडचणी असतात. त्याचबरोबर काम झालं पाहिजे. यासाठी किती आमदारांमध्ये तणाव असतो. हे सगळं माहिती आहे असाही टोला बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात लगावला. महाविकास आघाडीत कुणीही कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. हा बदल तुम्ही करत असताना तो एक नवा इतिहास नोंदवला जातोय. यावर पुस्तकं लिहिली जातील. तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली. याचं वाईट वाटतं अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला, पर्यावरणवादी तिथे निर्णय घेतलाय, त्याचा तुम्हाला फेरविचार करावा लागेल असं आवाहन बाळासाहेब थोरातांनी सांगितलं. महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरु झाला आहे. महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही. पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कर्जाची व्यवस्था नाही. या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झालंय.
राज्याने पिण्याच्या पाण्यासाठी तातडीनं बैठक घ्यावी असं देखील आवाहन थोरातांनी केलं.