आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद

आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. (Balasaheb Thorat comment on funds of Congress portfolio)

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 12:29 PM

नाशिक: महसलूमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते. (Balasaheb Thorat comment on funds of Congress portfolio)

वीजबिलांच्या प्रश्नावरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लॉकडाऊन काळात आलेल्या वीजबिलाच्या तक्रारी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोडवल्या आहेत. नितीन राऊत यांच्या बद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध आहे, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. बावनकुळे वीजबिलाच्या प्रश्नावरुन काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनामुळं राज्य सरकार आर्थिक अडचणीत आलं आहे. राज्याचे आर्थिक स्त्रोत वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याला पगारांसाठी दर महिन्याला 12 हजार कोटींचं कर्ज काढावं लागतंय. मात्र, राज्य सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.(Balasaheb Thorat comment on funds of Congress portfolio)

गुपकर कराररावरुन भाजपवर टीका

बाळासाहेब थोरात यांनी गुपकर करारामध्ये काँग्रेस सहभागी नाही हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींसोबत आधी भाजपाने युती करुन सत्ता स्थापन केली होती, आता भाजप नेते इतरांवर आरोप करत आहेत हा दुटप्पीपणा आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

मुंबई पालिका निवडणूक

राज्यात महाविकास आघाडी एकत्र सत्तेत आहेत. आगामी काळातील मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवू शकतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी लवकरच तिन्ही पक्षांची एकत्र बैठक घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणू तिन्ही पक्षांनी एकत्र येत लढवल्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारताचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो. राज्य घटनेतील समतेच्या मूलतत्त्वाला छेद देण्याचं काम सुरू आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सूडबुद्धीने आहे का ? याबद्दल माहिती नाही, असंही थोरात यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल

‘काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही’, फडणवीसांच्या आरोपांना थोरातांचे सडेतोड प्रत्युत्तर

(Balasaheb Thorat comment on funds of Congress portfolio)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.