Balasaheb Thorat : राज ठाकरेंमध्ये आता लढाऊ बाणा राहिला नाही; ठाकरेंबाबतच्या ‘त्या’ चर्चेवरून थोरातांचा टोला
मनसे आणि शिंदे गट यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिंदे गट यांच्यात आगामी निवडणुकांसाठी युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून मनसे आणि शिंदे गटात युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेबर थोरात यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. युती होऊही शकते. राज ठाकरेंमध्ये आता लढाऊ बाणा राहिला नाही, अशी टीका थोरात यांनी केली आहे.
नेमकं थोरात यांनी काय म्हटलं?
आगामी निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सध्या जोर पकडू लागली आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी यावर खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही खरे राज ठाकरे तेव्हाच पाहिले. युती होईलही मात्र राज ठाकरे यांच्यात आता पूर्वीप्रामाणे लाढाऊ बाणा राहिला नसल्याची टीका थोरात यांनी केली आहे. आता बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला मनसे नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदे गट, मनसे युतीच्या चर्चेला उधान
मुंबई महापालिकेसह राज्याच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिंदे गटामध्ये युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहेत. या चर्चेला अनुकूल अशा काही घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडत आहेत.
गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. या भेटीदरम्यान मनसे आणि शिंदे गट यांच्यातील युतीबाबत चर्चा झाल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या भेटीत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते.