शिर्डी : सरकारं बदलत असतात पण पोलिस यंत्रणा आहे तीच असते, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर विश्वास हवा, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना लगावलाय. विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरणं म्हणजे आम्हाला काळजीच वाटत की यात कुठले राजकारण तर नाही ना?, असंही थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat Slam Devendra Fadanvis over Sachin Vaze)
महाराष्ट्र आणि मुंबईची पोलीस यंत्रणा हि जगप्रसिद्ध आहे. स्कॉटलंड यार्ड नंतर आपल्या मुंबई पोलिसांचं नाव घेतल जातं. मग अशा वेळी पोलिसांचं मनोबल खच्ची होणार नाही याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी. विरोधक सत्तेत होते तेव्हा तेच पोलीस दल होतं. आपलं पोलीस दल सक्षम आहे, आमचा त्यावर विश्वास आहे, अशी प्रतिकया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सचिन वाझे प्रकरणी दिलीय.
विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरणं म्हणजे आम्हाला काळजीच वाटत की यात कुठले राजकारण तर नाही ना? सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटतायत मात्र तपास सुरू असल्याने त्यावर सध्या बोलणे योग्य नसल्याचं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय.
कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेले असताना आपण मात्र बेफिकीर झालो आहोत. ही बेफिकेरी आपल्याला त्रासदायक ठरणार असल्याचं थोरात म्हणाले. सरकारकडून केवळ अपेक्षा करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करणं गरजेच आहे. स्वत: आणि कुटुंबासाठी कोरोना नियमावलीचं पालन करावे असं थोरात म्हणालेत.
सरकारची लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही. पण नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं पालन करत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने सरकारला रुग्णांची वाढलेली रुग्णांची संख्या लक्षात घेता कठोर पावलं उचलावी लागत असल्याचं थोरात म्हणाले.
(Balasaheb Thorat Slam Devendra Fadanvis over Sachin Vaze)
हे ही वाचा :
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नारायण राणेंचं अमित शहांना पत्रं
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं भाकीत