Balasaheb Thorat : सागर बंगला आता वॉशिंग मशिनचे काम करतो; थोरातांचा फडणवीसांना टोला
काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे, भाजप (BJP) सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आदोंलन करण्यात आले. त्यापूर्वी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे, भाजप (BJP) सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेला सागर बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत आहे असा उपरोधिक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली याबाबत थोरात यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात सध्या जे काही सुरू आहे, ते घटनाविरोधी आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मात्र राज्यात जे सुरू आहे, त्याकडे राज्यातीलच नाही तर देशातील जनतेचे लक्ष असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांवर हल्लाबोल
जुन्या मंत्र्यांचे पीए पुन्हा नियुक्त करताना सर्व बाबी तपासून घ्याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत थोरात यांना विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सागर बंगला हा वॉशिंग मशिनचे काम करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या घडोमोडीवरून देखील त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या काय सुरू आहे. सरकार कशापद्धतीने सत्तेत आले, याकडे राज्याच्या नाही तर देशातील जनतेचं लक्ष असल्याचे थोरात यांनी म्हटलं आहे. आता थोरात यांच्या टीकेला फडणवीस काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जयंत पाटलांचीही टीका
दरम्यान दुसरीकडे जयंत पाटील यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या सरकारकडून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. विरोधकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मात्र कितीही आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नसल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवायांवरून देखील त्यांनी भाजपावर निशाणा साधाला आहे.