मराठा आरक्षणाची ओवाळणी द्या, बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या
संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि मेव्हणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेतला होता.
शिर्डी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या घरासमोर बहिणीनेच ठिय्या मांडला होता. मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) ओवाळणी देण्याची गळ यावेळी दुर्गा तांबे यांनी भावाला घातली. (Balasaheb Thorat’s Sister Durga Tambe protest outside his home for Maratha Reservation)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जवळपास एक तासभर ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि मेव्हणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेतला होता.
मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करुन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पाठपुरावा करावा. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हीच बहिणीला ओवाळणी ठरेल, अशा भावना यावेळी दुर्गा तांबे यांनी व्यक्त केल्या.
‘बंधू बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आम्ही सर्व मराठा आंदोलक जमलेलो आहोत, बाळासाहेबांना माझी विनंती आहे, मराठा आरक्षणातील त्रुटी आणि कमतरता आहेत, त्या दूर कराव्या. शासनाच्या दारी असताना आपण सर्वांनी त्याचा परिपाक आणि पाठिंबा द्यायला हवा. त्याचा अभ्यास करावा’ अशी मागणी दुर्गा तांबेंनी केली.
‘मराठा आरक्षण मिळायलाच हवं. मराठा समाज हा महाराष्ट्रातील विखुरलेला समाज आहे. कुणबी समाज आहे. त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळण्यासाठी, कारण नोकरीमध्ये त्यांना स्थान नाही. अनेक ठिकाणी त्यांना स्थान मिळत नाही. अत्यंत तुटपुंज्या जमिनीवर अतिशय काटक आणि चिवटपणे जगण्याचा प्रयत्न असतात, म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे’ असंही त्या म्हणाल्या.
‘महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त माझ्या बंधूंकडे मी मराठा आरक्षणांची ओवाळणी मागत आहे’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Balasaheb Thorat’s Sister Durga Tamber protest outside his home for Maratha Reservation)
मराठा आरक्षणावरुन राज्यभरात जोरदार आंदोलन सुरु आहे, ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. अशातच मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली होती.
Sangli | आरक्षणाची मागणी, आमदार विश्वजित कदम यांच्या घरासमोर आंदोलन | सांगली – TV9 pic.twitter.com/pquhDOhtTr
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2020
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक
(Balasaheb Thorat’s Sister Durga Tambe protest outside his home for Maratha Reservation)