Shivsena : ‘मातोश्री’ला चॅलेंज देणाऱ्या बांगरांनी आता निवडून येऊन दाखवावे, शिवसेनेत प्रवेश करताच टारफे अन् मगर यांचे बांगरांना थेट आव्हान
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा स्वभाव आक्रमक आहे. शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्या चांगल्याच चर्चेत राहिलेल्या आहेत. मात्र, आता माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर हे समविचारी नेत्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे मतदारांना एक नवा पर्याय समोर राहणार आहे.
मुंबई : (Shivsena Party)शिवसेनेतील बंडानंतर कळमनुरीचे (MLA Santosh Bangar) आमदार संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. बंडखोर आमदारांचा त्यांनी एकेरी उल्लेख तर केलाच पण त्यांना शिव्या शापही दिले. तेच संतोष बांगर अवघ्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे गटात शामिल झाले होते. एवढेच नाहीतर त्यांनी थेट मातोश्री आणि पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारी वक्तव्यही केली होती. कॉंग्रेसचे माजी आमदार आणि शेतकरी नेते अजित मगर यांनीच आता शिवबंधन बांधले आहे. शिवाय हातामध्ये शिवबंधन बांधताच ‘मातोश्री’ आव्हान देणारे बांगर यांनी आगामी निवडणुकीमध्ये निवडून येऊन दाखवावे असे खुले आव्हानच दिले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटाला शिवसेनेने पर्याय उभा केला असून आगामी काळातच कुणाचे नेतृत्व जनता मान्य करणार हे पहावे लागणार आहे.
समविचारी नेते एकत्र, बांगरांच्या अडचणीत वाढ
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा स्वभाव आक्रमक आहे. शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्या चांगल्याच चर्चेत राहिलेल्या आहेत. मात्र, आता माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर हे समविचारी नेत्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे मतदारांना एक नवा पर्याय समोर राहणार आहे. संतोष बांगर यांचा आक्रमक स्वभाव आणि गेल्या दोन महिन्यात त्यांनी वेळोवेळी बदलेली भूमिका ही जनतेला मान्य नाही. विकास कामाचा त्यांना विसर पडला असून बेताल वक्तव्यानेच ते चर्चेत राहत आहेत. याबाबत कळमनुरी मतदारसंघातील जनता जागृत असून आगामी काळात त्यांनी मातोश्रीला दिलेले आव्हान याची परतफेड तर करावीच लागेल असे टारफे यांनी सुनावले आहे.
एक माजी आमदार तर दुसरे शेतकरी नेते
शिवसेनेमध्ये एकाच दिवशी माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी प्रवेश केला यामागे पक्षाची वेगळी अशी धोरणे आहेत. शिवसेनेतून बंड करुन कायम टीका करणाऱ्या बांगरांना आव्हान देण्यासाठीच एक माजी आमदार आणि दुसरे शेतकरी नेते हे एकत्र आले आहेत. संतोष टारफे हे कळमनुरी मतदार संघाचे माजी आमदार आहेत तर अजित मगर हे शेतकरी नेते आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत यांची ताकद एकवटली तर संतोष बांगर यांना ते आव्हानात्मक असेल. त्यामुळे सत्तांतर आणि त्यानंतर बांगर यांची भूमिका याकडे जनता कशी पाहतेय हे महत्वाचे आहे.
शिवबंधन बांधल्यानंतर काय म्हणाले टारफे?
आता समविचारी लोक एकत्र आले आहेत. लोकप्रतिनीधींचा आक्रमकपणा दिखाऊ असला तरी तो सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. आगामी काळात त्यांच्या या वर्तणुकीचे रिझल्ट पाहवयास मिळतील. मात्र, एकाच विचाराचे आम्ही एकत्र आल्याने परिवर्तन तर होणारच असे आव्हानाच टारफे यांनी दिले आहे.