तृणमूल काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या बांग्लादेशी कलाकारांचा व्हिसा रद्द
कोलकाता : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे. निवडणुकांसाठी प्रचार करताना अनेक नेते-मंडळी सिनेमातील कलाकारांचा सर्रास वापर करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी बांग्लादेशी कलाकारांचा वापर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात […]
कोलकाता : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे. निवडणुकांसाठी प्रचार करताना अनेक नेते-मंडळी सिनेमातील कलाकारांचा सर्रास वापर करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी बांग्लादेशी कलाकारांचा वापर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशी कलाकारांचा व्हिसा VISA रद्द केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील रायगंज परिसरात टीएमसीचे उमेदवार कन्हैय्या लाल यांचा बांग्लादेशी अभिनेता फिरदौस अहमद आणि गाजी अब्दुन नूर हे दोघेही प्रचार करताना दिसत होते. त्यावेळी त्यांनी फिरदोस अहमदने पश्चिम बंगालच्या रायगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले होते. यानंतर भाजपसह विरोध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी हे बांग्लादेशी कलाकार कोणत्या अधिकारे एखाद्या पक्षाचा प्रचार करु शकतात असा प्रश्नही भाजपने विचारला होता.
पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जींकडून प्रचारासाठी बांगलादेशी कलाकारांचा वापर, परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशी कलाकारांचा VISA रद्द pic.twitter.com/JrywpZf5l0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2019
यानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली होती. तसेच याबाबत गृहमंत्रालयाने सिलीगुडी प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागितला होता. अद्याप प्रशासनाने याबाबतच अहवाल सादर केलेला नाही.
तर दुसरीकडे बांग्लादेशाच्या उच्चायुक्तांनी फिरदौस अहमदला तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशी कलाकारांचा व्हिसा रद्द करावा असे आदेश दिले आहेत. फिरदौस हे बिजनेस व्हिसावर भारतात आले होते व त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाविरुद्ध प्रचारसभेत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचा व्हिसा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि त्यांनी तात्काळ मायदेशी परतावे असे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आहे.