वर्तमानपत्रातून आमदार बच्चू कडूंना बँकेची नोटिस

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे नेहमीच आपल्या आक्रमकपणा आणि रोखठोक शैलीमुळे चर्चेत असतात. मात्र आज बच्यू कडू वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. शेती गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने त्यांच्या शेतीचा लिलाव करण्याची नोटीस वर्तमानपत्रात छापून आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथील जनता […]

वर्तमानपत्रातून आमदार बच्चू कडूंना बँकेची नोटिस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे नेहमीच आपल्या आक्रमकपणा आणि रोखठोक शैलीमुळे चर्चेत असतात. मात्र आज बच्यू कडू वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. शेती गहाण ठेवून घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने त्यांच्या शेतीचा लिलाव करण्याची नोटीस वर्तमानपत्रात छापून आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती येथील जनता बँकेने शेत जमीन जप्तीची नोटीस वृत्तपत्रात छापून पाठवली आहे. आमदार बच्चू कडू यांची पत्नी नयना कडू आणि जमानतदार म्हणून विपिन लिल्हार यांची नावे या नोटीसमध्ये दिली आहेत. एकूण 25 लाख 53 हजार 177 रुपये कर्जाची रक्कम दाखवली आहे. अनेक वर्षापासून कर्जफेड न झाल्याने रक्कम दुप्पट तिप्पट झाली आहे. शेतातील पिकासोबत त्यांच्या जमिनीचा ताबाही घेण्यात येईल असे या नोटिसमध्ये लिहिण्यात आलं आहे.

बँकेची कोणत्याही प्रकारची नोटिसची प्रत मला मिळाली नाही. बँकेने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही नोटिस दिली आहे. ही माझी राजकीय बदनामी करण्याचे षड्यंत्र आहे. पण शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे त्याना बँक नोटिस देतात त्यांना ज्या प्रकारचा मानसिक त्रास होतो तसाच त्रास मलाही होत आहे. असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू हे वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन करून सरकारला सतत कोंडीत पकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात पटाईत आहेत. आमदारांचा पगारवाढ असेल, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि अपंगाचे प्रश्न नेहमीच रेटून धरतात तसेच हजारो रुग्णांना मदत करणे इत्यादी उपक्रम बच्चू कडूंचे सुरु असतात. परंतु आर्थिक गणित त्यांचे कधी जुळले नसल्यामुळे अनेकदा त्यांना कर्ज घ्यावे लागले आहे. निवडणुकीत मतदार त्यांच्याकरीता पैसे गोळा करून प्रचार करतात. समाजसेवा करताना अनेकदा घरातील वस्तू देखील गहाण ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.