‘महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे’! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे यांचं बॅनर

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे.

'महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे'! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे यांचं बॅनर
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 1:22 PM

ठाणे :  ठाण्यामधून (Thane) मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. मात्र आता त्याच ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले आहेत. महाराष्ट्र योद्धा असा या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.  हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘ न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचाराराच खरा वारसदार उद्धव ठाकरे’ असा या बॅनरवर मजकूर छापण्यात आला आहे. या बॅनरवरून ठाण्यात एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचं समर्थन वाढत असल्याचं दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे-शिंदे गटात तणाव

दरम्यान एकीकडे ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत. मात्र दुसरीकडे डोंबिवलीत ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शिंदे गटाने डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्यानं परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची महािती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कही महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.