‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांचा अधिकाऱ्याला टोला

अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी एका अधिकाऱ्यानं मास्क घातला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं.

'बघा हे महाराज विनामास्क बसलेत', बारामतीत अजित पवारांचा अधिकाऱ्याला टोला
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 7:55 PM

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना नियमांचं अत्यंत गांभीर्यानं पालन करतात. त्याचे दाखले खुद्द खासदार सुप्रिया सुळेही अनेक कार्यक्रमात देत असतात. अनेकदा तर अजित पवार कार्यकर्त्यांनी आणलेले बुकेही स्वीकारत नाहीत. यावरुन अजितदादा कोरोनाबाबत किती जागृत आहेत हे पाहायला मिळतं. स्वत: कोरोना नियमांचं पालन करताना अजितदादा अनेकदा कार्यकर्ते, नागरिकांनाही नियमांचं पालन करण्याच्या सूचना देताना दिसून आले आहेत. अजितदादा बारामती दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा त्याचं प्रत्यंतर आलं. (Ajit Pawar got angry at an officer sitting without a mask)

अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी एका अधिकाऱ्यानं मास्क घातला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलंच खडसावलं. या कार्यक्रमात मी मुद्दाम सगळ्यांकडे पाहत होतो. तर हे महाराज विनामास्क बसलेत. बाबांनो स्वत:ची काळजी घ्या. मास्क नियमीत वापरा. तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने कोरोना पुन्हा डोकाऊ पाहतोय. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी दिलाय.

कोरोना काळात अनेक महत्वाचे सण, उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आलेत. याबाबत खंत व्यक्त करतानाच अजित पवार यांनी जनतेची काळजी म्हणून असे निर्णय घ्यावे लागत असल्याचे नमूद केलं. पण काहीजण यावरून नाहक राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी विरोधकांवर केलीय.

अजितदादांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री!

कटफळ येथे ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. या प्रात्यक्षिकावेळी एक दारुडा चक्क नमस्कार घालत अजितदादांच्या पुढे आला. त्यावर अजित पवार यांनी हा तर दुपारीच चंद्रावर गेलाय असं म्हणताच पोलिस त्याला बाजूला घेऊन गेले.

‘लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत’

या प्रकारानंतर मुख्य सभेत अजित पवार यांचे भाषण सुरु असताना स्थानिक ग्रामस्थांनी गावात दारुबंदीची मागणी केली. त्यावर अजितदादांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना माझ्या तालुक्यात असले धंदे नकोत अशी सूचना केली. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत. आज श्रावणी शनिवार आहे तरीही चाललंय. काहीजण व्यसनाधीन झाले की त्रास होतो.. त्यांना व्यसनापासून बाजूला ठेवायचं कामही आपण सर्वांनी केलं पाहिजे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

अजित पवार यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात पोलिसांना दारु विक्रीसह अवैध धंदे बंद कण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आज चक्क अजितदादांच्या कार्यक्रमावेळी दारुड्याची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीत दारुधंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. सोबतच व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी आपले कार्यकर्ते आणि नागरिकांना केली.

इतर बातम्या :

‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, संजय राऊतांचा घणाघात

राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय? पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राजू शेट्टी काय म्हणाले वाचा

Ajit Pawar got angry at an officer sitting without a mask

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.