Video | शरद पवार पुढे, अजित पवार मागे, लोकांचे कागद गोळा करताना व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?

Viral Video of Sharad Pawar & Ajit Pawar : बारामती हे बारामती बनण्याचं कारण काय आहे, हे या व्हिडीओतून दिसतं, असं म्हणत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. बारामतीच्या लोकप्रतिनिधींना जनसंपर्क किती दांडगा आहे, हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Video | शरद पवार पुढे, अजित पवार मागे, लोकांचे कागद गोळा करताना व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?
अजित पवार आणि शरद पवारांचा सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 3:30 PM

बारामती : सोशल मीडिया हे काही फक्त व्हायरल (Viral in Social Media) होण्याचं ठिकाण आहे, असं नाही. इथं अपलोड होणारी, शेअर केली जाणारी, प्रत्येक गोष्ट आरशासारखी असते. जसं आरशासमोर काहीच लपून राहत नाही, तसंच सोशल मीडियाचंही आहे. इथं काही लपून राहत नाही. चांगलं वाईट सगळंकाही इथं वाऱ्यासारखं पसरतं. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. आता बारामतीमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवार पुढे चालत गाडीत बसण्यासाठी येताना दिसतात. त्यानंतर गाडीच्या दरवाजात उभे राहून मागे एक नजर टाकतात. मागून अजित पवार चालत येताना दिसतात. ते वेगवेगळे कागद गोळा करत असतात. हात लांबवून ते लोकांकडून वेगवेगळे कागद गोळा करताना दिसून आलेत. आजुबाजूला त्यांचे बॉडीगार्डही दिसून येतात. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) पुढे, अजित पवार (Ajit Pawar) मागे आणि लोकांचे कागद गोळा करतानाचा हा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ बारामतीमधील असल्याचा दावा केला जातो आहे.

बारामतीमधील हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओवर श्रीजीत काळे असा वॉटरमार्कही दिसून आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक, इन्टाग्रामसह अनेकांनी व्हॉट्सअपवर स्टेटवर हा व्हिडीओ शेअर केलाय.

नेमका व्हिडीओ कधीचा?

फेसबुक युजर अनुप अभिमान नलावडे यांनींही हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. हा व्हिडीओ बारामती मधला असून शिवजयंती दिवशी (19 फेब्रुवारी, 2022) हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बारामती पंचायत समिती नवीन इमारत उद्घाटन समारंभाच्या निमित्त बारामतीचे दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार आले होते. त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर परतत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांकडून वेगवेगळे कागद गोळा करताना दिसून आले आहेत.

बारामती हे बारामती बनण्याचं कारण काय आहे, हे या व्हिडीओतून दिसतं, असं म्हणत अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. बारामतीच्या लोकप्रतिनिधींना जनसंपर्क किती दांडगा आहे, हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. असंख्य लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लोकांच्या गराड्यातून जात असताना त्यांचे विनंती अर्ज घेत अजित पवार जाताना दिसलेत. त्याआधी सुरुवातीला शरद पवार हे पुढे येऊन गाडीच्या दारापाशी थांबतात आणि मागून येणाऱ्या अजित पवारांकडे एक नजर टाकतात असंही दिसून आलं आहे. यावेळी तोबा गर्दी बारामतीकरांनी या दोन्ही दिग्गज नेत्यांना भेटण्यासाठी केली असल्याचंही दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ :

व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा

संबंधित बातम्या :

Video | ‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं!’ ती गोष्ट पाहून मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.