बारामतीचे धडे सरपंचाचा मुकूट बीडचा! दुष्काळ दूर करेन, गावाचं नाव जगात नेईन, 21 वर्षाची तरुणी, कारकीर्दीला धडाक्यात सुरुवात

बीड- अहमदनगर सीमेवर असलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळन- औरंगपूर ही गटग्रामपंचायत आहे. आता भारती इथली सरपंच आहे.

बारामतीचे धडे सरपंचाचा मुकूट बीडचा! दुष्काळ दूर करेन, गावाचं नाव जगात नेईन, 21 वर्षाची तरुणी, कारकीर्दीला धडाक्यात सुरुवात
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 4:09 PM

बीडः डोळ्यासमोर सतत दुष्काळ, ग्रामस्थांचे हाल पाहतानाच तिनं एक स्वप्न पाहिलं. माझ्या गावात हरितक्रांती आणेन. ध्येय गाठण्यासाठी बारामतीत कृषी विषयात शिक्षणही सुरु केलं. आपली कन्या गावाच्या हितासाठी एवढा विचार करतेय, धडपड करतेय, हे पाहून गावकऱ्यांनी ग्राम पंचायतीनी निवडणूक (Gram Panchayat Election) लढवण्याचा आग्रह धरला. पाहता पाहता गावानं मागणी उचलून धरली अन् 21 व्या वर्षीच भारती बाळासाहेब मिसाळ (Bharati Misal) सरपंच (SarPanch) झाली.

ही कहाणी आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळन गावातल्या तरुणीची. किंबहुना असं म्हणता येईल, या तरुणीच्या धडपडीची कथा आताकुठे सुरु झाली आहे. आता सरपंच पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गावाचं नाव जगाच्या नकाशात ओळखलं जाईल, यासाठी ती झटणार आहे. भारती बाळासाहेब मिसाळ ही राज्यातली सर्वात लहान महिला सरपंच असल्याचा दावा करण्यात येतोय.

Bharati

बीड- अहमदनगर सीमेवर असलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळन- औरंगपूर ही गटग्रामपंचायत आहे. हातोळन गावातच भारती हिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.

वडील बाळासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे घरात सतत परिवर्तनवादी विचार नांदत असायचे. वडिलांचा प्रभाव भारती हिच्यावर पडला. गावात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबून असायचे.

Bharati Misal

शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या भारतीने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कृषी शिक्षण घेऊन गावात हरित क्रांती आणण्याचे स्वप्न पाहिले. बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गावाकडे ग्रामपंचायत निवडणूक लागली.

Bharati Misal

मतदार यादीत तिचे पहिल्यांदाच नाव आले होते. गावच्या लेकीची धडपड पाहून ग्रामस्थांनी बैठक घेऊन भारतीच्या वाडीलांकडे निवडणूक संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला.

भारतीचा होकार अन नशीब पालटलं

सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतल्यानंतर भारतीला निवडणूक रिंगणात उभे केले. प्रचार देखील दमदार झाला. पॅनलचे नाव परिवर्तन पॅनल देण्यात आले. कसलाही अनपेक्षित खर्च न करता भारतीला ग्रामस्थांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. आज संपूर्ण गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पहिल्यांदाच मतदान आणि थेट सरपंच झाल्याने पोरीचं नशीब उजळलं अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे.

मतदानाची पहिलीच वेळ अन्…

भारती मिसाळ हिचे पाहिल्यांदाच मतदार यादीत नाव आले. पाहिल्यांदाच मतदान करण्याची ओढ वेगळीच होती. मात्र याच मतातून स्वतः सरपंच होईल याची पुसटशीही कल्पना भारतीला नव्हती. गाव हिरवंगार करणं आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याचा तिचा मानस आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.